छत्रपती संभाजीनगर

हवालदाराची 9,89,000 रुपयांची फसवणूक ! शेअर मार्केटच्या नावाखाली डॉलरमध्ये पैसे परावर्तीत करून बक्कळ नफा देण्याची थाप !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २५- शेअर मार्केटच्या नावाखाली डॉलरमध्ये पैसे परावर्तीत करून बक्कळ नफा देण्याची थाप मारून हवालदाराची 9,89,000 रुपयांची फसवणूक केली. शेअर मार्केटमध्ये EX plus 500 या कंपनीमध्ये पैसे गुंतवणुक करून सदरचे पैसे डॉलरमध्ये परावर्तीत करून त्यावर नफा देण्याचे आमिष दाखवून एकूण 9,89,000/-रुपयांची फसवणुक झाल्याप्रकरणी छावणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुदीप कुमार दीक्षित व सुनील सोलंखे अशी आरोपींची नावे आहेत. महेंद्रकुमार रंगबाज सिंग (हवालदार, 51- एम. एच. ए. एन.सी.सी बटालियन, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सिंग यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार 29 एप्रील 2023 सुदीप कुमार दीक्षित याने त्याच्या मोबाईलवरून व्हॉट्स अॅपवर शेअर मार्केट मध्ये EX Plus 500 या कंपनीमध्ये डिमॅट अकाउंट सुरु करण्यासाठी एक लिंक पाठवली होती.

हवालदार महेंद्रकुमार सिंग हे सुदीप कुमार दीक्षित याला ओळखत नसल्याने त्यांनी फोन करून विचारले की, सदरची लिंक कशासंदर्भाने आहे तू आगोदर तुझे आधार कार्ड, पॅन कार्ड पाठव नंतरच मी तुझ्याकडुन डिमॅट अकाउंट सुरु करुन घेईन. त्यानंतर सुदीप कुमार याने हवालदार महेंद्रकुमार सिंग यांना त्याचे आधार कार्ड, पैन कार्चे फोटो व्हॉट्ॲप वर पाठवल्याने हवालदार महेंद्रकुमार सिंग यांना विश्वास आला. त्यानंतर त्यांनी त्याला पॅन कार्ड, आधार कार्ड आदी त्याच्या व्हॉट्ॲपवर पाठवून FX Plus 500 या कंपनीमध्ये डिमॅट अकाउंट सुरु केले.

सदर कंपनीमध्ये अकांउट सुरु केल्यानंतर त्या कंपनीमध्ये पैसे भरायचे होते आणी त्यानंतर सदरची कपनी ही ते पैसे डॉलर मध्ये ट्रान्सफर करून शेअर मार्केटमध्ये गुतंवणूक करून त्यावर मिळणारा नफा रोजच्या रोज आपल्या खात्यामध्ये टाकत असे. यानंतर हवालदार महेंद्रकुमार सिंग 29 एप्रील 2023 रोजीच सुदीप कुमार दीक्षित यांनी दिलेल्या कंपनीच्या खात्यावर 76,000/-रुपये (623 डॉलर) फोन पेच्या माध्यमाने केले. त्यावर 156 डॉलर बोनस मिळाले असे एकूण त्यांच्या खात्यावर 779 डॉलर जमा झाले होते.

त्यानंतर एक महिन्यात हवालदार महेंद्रकुमार सिंग यांना दररोज 30 ते 35 डॉलर नफा मिळत होता, असे मिळून त्यांच्या खात्यावर 1268 डॉलर जमा झाले होते. दरम्यान, हवालदार महेंद्रकुमार सिंग यांनी 600 डॉलर विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला परंतू 600 डॉलर विड्रॉल झाले नाही म्हणुन हवालदार महेंद्रकुमार सिंग यांनी सुदीप कुमार याला फोन करून विचारले तर त्याने सांगितले की, शेअर मार्केट सध्या लाइव्ह ट्रेड चालु आहे तुमचे पैसे विड्रॉल होणार नाही. तुम्हाला आणखी पैसे भरावे लागतील व माझे मॅनेजर सुनिल सोलंखे हे तुम्हाला फोन करतील म्हणून सांगितले. नंतर समोरच्याने थाप मारून वेळोवेळी पैसे मागितले आणि फिर्यादीनेही समोरच्यावर विश्वास ठेवून पैसे पाठवले. एकूण 9,89,000/ रुपयांची फसवणूक झाली.

महेंद्रकुमार रंगबाज सिंग (हवालदार, 51- एम. एच. ए. एन.सी.सी बटालियन, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुदीप कुमार दीक्षित व सुनील सोलंखे यांच्यावर छावणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!