छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

आयुक्त जी श्रकांत यांचे धडाकेबाज निर्णय: मागेल त्याला अंत्यविधीची व्यवस्था मोफत देण्याचे निर्देश ! शुन्य पटसंख्येच्या शाळा बंद करा, शिक्षकांची हजेरी घेऊनच पगार करा, गुंठेवारीचाही घेतला आढावा !!

आता वार्ड ऐवजी महानगरपालिका झोन गट

संभाजीनगर लाईव्ह, दि.१० – मागेल त्याला मोफत अंत्यविधीची सोय उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी स्मार्ट सिटी कार्यलयात आयोजित विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत आज दिले. आज स्मार्ट सिटी कार्यालयात महानगरपालिकेच्या सर्व विभागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिक्षण, मालमता, गुंठेवारी, घनकचरा व्यवस्थापन, अग्निशमन या विभागाचा आढावा घेण्यात आला.

०१ जुलै पासून स्मार्ट गुरू ऍप द्वारे सर्व मनपा शाळेत हजेरी सुरू करण्यात आली आहे. यामुळे काम अतिशय सोपे झाले आहे. यामुळे कामात सुसूत्रता आली असून शिक्षक सतर्क झाले आहेत. या १० दिवसांत शाळेतील उपस्थिती मध्ये १२% वाढ झाली आहे अशी माहिती उप आयुक्त नंदा गायकवाड यांनी दिली. शिक्षकांची हजेरी घेतली तरच त्यांचा पगार करण्यात येईल अशा सूचनाही प्रशासक जी श्रीकांत यांनी यावेळी दिल्या. तसेच ज्या भागात पट उपस्थिती शून्य आहे ती शाळा बंद करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मालमत्ता विभागाचा आढावा घेताना प्रशासक म्हणाले की, येत्या सात दिवसांत प्रत्येक झोनची ब्लॉकिंग करून घ्या, ब्लॉक बदलता कामा नये असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. एक ही मालमत्ता सुटता कामा नये त्या ठिकाणी टॅगिंग करा असे ते म्हणाले. आता वार्ड ऐवजी महानगपालिका झोन गट असे म्हणा असे प्रशासक म्हणाले. महानगरपालिकेचे आता १० प्रशासकीय झोन असणार आहेत.

नागरिकांच्या सोयीसाठी आता मागेल त्याला मोफत अंत्यविधी  सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या गॅस शवदहिनी मध्ये ही सोय असणार आहे. तसेच प्रत्येक स्मशानभूमी ही झोन अधिकारी यांच्या नियंत्रणात राहील.

गुंठेवारी बाबत प्रशासक जी श्रीकांत म्हणाले की कमीत कमी कागदपत्रे आणि सहजपणे गुंठेवारी करता येईल का याचा आराखडा तयार करा. घनकचरा व्यवस्थापन, अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाला वॉकी टॉकी देण्यात येणार आहे. यामुळे कामात गती प्राप्त होईल असे ते म्हणाले.

नागरीमित्र पथक कर्मचाऱ्यांना आता घन कचरा व्यवस्थापन करणेसाठी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, सौरभ जोशी, सर्व विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.

Back to top button
error: Content is protected !!