छत्रपती संभाजीनगर महापालिकेची सिडको, सेंट्रल नाका, आजाद चौक रस्त्यावर धडाकेबाज कारवाई ! एक कोटीच्या भूखंडासह ३२ अतिक्रमण भूईसपाट !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि.३ मार्च – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागाने मनपा मालकीच्या एक कोटीच्या भूखंड वरील अतिक्रमण हटवून भूखंड मोकळा करण्यात आला. तसेच सिडको एन ०६ सेंट्रल नाका ते आजाद चौक या रस्त्यावरील एकूण ३२ रस्ता बाधित अतिक्रमणे काढण्यात आली.
महानगरपालिका जनहित याचिका क्रमांक 109 2015 अंतर्गत बजरंग चौक ते साईनगर येथील मनपाच्या शॉपिंग मॉल दुकाने लगत एका मोठ्या खुल्या प्लॉटवर अज्ञात व्यक्तीने सिमेंटचे खांब लावून तार फेंसिंग केली होती आणि गेट बसून आजूबाजू पत्रे लावले होते. अतिक्रमण विभागाने सदर अतिक्रमण निष्कसित करून साहित्य जप्त केले आहे. यामुळे महानगरपालिकेचा एक कोटीचा भूखंड मोकळा झाला आहे .
तसेच एन ०६ सेंट्रल नाका ते आझाद चौक या रस्त्यावर आज एकूण ३२ मालमत्ताधारकांना जागेवरच मार्किंग देऊन हे पूर्ण अतिक्रमण पाडण्यात आले. सदर अतिक्रमण मध्ये नागरिकांनी तात्पुरते पत्र्याचे शेड तर काही नाही सिमेंट रेती मध्ये ब दहा बाय दहा व दहा बाय पंधरा या आकाराचे अतिक्रमण केले होते.
यामध्ये अतिक्रमण धारकांनी गॅरेज, इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री, पान शॉप तसेच प्लायवूड दुकाने या स्वरूपाचे अतिक्रमण केले होते .हे सर्व अतिक्रमण काढण्यात आलेली आहेत. यानंतर आझाद चौक ते सेंट्रल नाका प्रशांत बियर बार लगत असलेल्या सर्व दुकानदारांना मार्किंग देण्यात आली आहे. अतिक्रमणे काढण्याची कारवाई अशीच सुरू राहील.
ही कारवाई प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांचे मार्गदर्शनाखाली पद निर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे, इमारत निरीक्षक रामेश्वर सुरासे, पंडित गवळी, सय्यद जमशेद, मझर अली, सिडकोचे उप अभियंता उदय चौधरी व त्यांचे सहकारी अधिकारी कर्मचारी महानगरपालिकेचे पोलीस कर्मचारी व मजूर यांनी केली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe