संभाजीनगर लाईव्ह, दि. २ – छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणार्या अंतर्गत जलवाहिनीवर अनेक ठिकाणी असलेले अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे. या मोहीमेअंतर्गत इ सेक्टर एन-६ येथे ९ अनधिकृत नळ कनेक्शन पथकाने तोडले. या कारवाईमुळे अनधिकृत कनेक्शनधारकांचे धाबे दणाणले आहे.
प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अनधिकृत नळ जोडणी शोध पथकचे प्रमुख संतोष वाहुळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा पथक प्रमुख यांच्या अधिपत्त्याखाली इ सेक्टर एन-६ येथे असलेल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची १५० मिमी जलवाहिनी वरील एकूण ०९ अनधिकृत नळ खंडित करण्यात आले.
ही कारवाई कार्यकारी अभियंता के. एम. फालक, पथक अभियंता रोहीत इंगळे, कनिष्ठ अभियंता भूषण देवरे, पथक कर्मचारी मो. शरीफ, वैभव भटकर, स्वप्निल पाईकडे, तमिज पठाण, सागर डिघोळे, तुषार पोटपिल्लेवार यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe