महानगरपालिकेचे दोन वसुली कर्मचारी लाच घेताना चतुर्भूज ! घराचे बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मनपात चाललंय तरी काय ?
संभाजीनगर लाईव्ह, दि. ९ – घराचे बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या दोन कंत्राटी वसुली कर्मचारी जाळ्यात अडकले. लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
1. प्रदीप शिवराम गराडे (वय 33 वर्षे, पद – वसुली कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, वार्ड क्रं 8 , मनपा छत्रपती संभाजीनगर , रा. CL-5-362, 12वी योजना, शिवाजीनगर), 2. सुरेंद्र रमेशराव रुपदे (वय 34 वर्षे, पद – वसुली कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, वार्ड क्रमांक 8, मनपा, रा. A 20/01 11वी योजना, शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणातील तक्रारदार यांचे एशियाड कॉलनी, देवळाई परिसर, छत्रपती संभाजीनगर येथील राहते घराचे बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी आरोपी प्रदीप शिवराम गराडे याने यापूर्वी 8 हजार रुपयाची मागणी करून त्या पैकी 5000 रू स्वतः स्वीकारले होते व आज रोजी त्यापैकी उर्वरित 3000 रुपयाची मागणी केली. तसेच राहिलेले 3000 रुपयांची आरोपी प्रदीप शिवराम गराडे याच्या सांगण्यावरून पंच साक्षीदार समक्ष आरोपी सुरेंद्र रमेशराव रुपदे याने मागणी करून रुपये 3000/- लाचेची रक्कम स्वतः पंचा समक्ष स्वीकारली असता ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, मारूती पंडित, पोलिस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी रेश्मा सौदागर, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पोह. रविंद्र काळे, पो.ना. राजेंद्र सीनकर, चापोअं/चांगदेव बागुल यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe