दहावीच्या विद्यार्थिनीचे शिक्षकाने चुंबन घेतले, क्लासचा दरवाजा आतून लावून धमकावले ! एक्सलेन्स अॅकॅडमी क्लासेसमधील संतापजनक प्रकार !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २१ – क्लासचा आतून दरवाजा लावून शिक्षकाने विद्यार्थिनीचे चुंबन घेतल्याचा संतापजनक प्रकार एक्सलेन्स अॅकडमी गजानन नगर छत्रपती संभाजीनगर शहरात घडला. याप्रकरणी सदर विद्यार्थिनीने पोलिस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगितला.
राजेश कैलास शिंगारे (रा. गजानन नगर, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. फिर्यादी दहावीची विद्यार्थीनी मैत्रिणीसोबत क्लासला गेली होती. तेथे विज्ञानाचे शिक्षक राजेश शिंगारे यांना नोट्स मागितले. यावर शिक्षक राजेश शिंगारे यांनी थांब मी नोट्स देतो माझ्या सोबत चल असे म्हणून फिर्यादी विद्यार्थिनीसोबत क्लासमध्ये गेले.
तेथे आरोपी राजेश शिंगारे यांनी क्लासच्या आतून दरवाजा लावून घेतला. शांत बस नाहीतर तुला मारून टाकीन अशी धमकी त्या विद्यार्थिनीला दिली. त्यानंतर फिर्यादी विद्यार्थिनीस जवळ ओढून तिचे चुंबन घेतले व फिर्यादीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले.
याप्रकरणी सदर विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून पुंडलीकनगर पोलिस स्टेशनमध्ये शिक्षक राजेश कैलास शिंगारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उपनि माळी करत आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe







