छत्रपती संभाजीनगर
Trending

विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड : वेतनासह दिवाळी अग्रिमही बॅंकेत जमा ! शैक्षणिक व प्रशासकीय विभागाला अशा असेल दिवाळीच्या सुट्ट्या !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि.९ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक, कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी अशा बाराशे जणांचे वेतन दिवाळीपूर्वी जमा झाले आहे. तसेच तीनशेहून अधिक कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पंचवीस हजाराचे फेस्टिव्हल ऍडव्हान्स (दिवाळी अग्रीम) दिवाळीच्या पूर्वसंध्येला जमा झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

विद्यापीठात सध्या ४०७ कर्मचारी –, ४३६ कंत्राटी कर्मचारी, ९८ सुरक्षा कर्मचारी व ७८ स्वच्छता कर्मचारी तसेच १८० प्राध्यापक असे सुमारे बाराशे जण आहेत. एरव्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन १५ तारखेला होत असते परंतु दिवाळीमुळे त्याबद्दल जमा करण्यात आले आहे. तर कायमस्वरूपी सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २५ हजार फेस्टिवल ऍडव्हान्स देण्याची मागणी कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी मंजूर केली असून अग्रीम खात्यावर जमा झाले आहे. याबद्दल कर्मचारी संघटनेचे नेते डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी मा .कुलगुरू यांची भेट घेऊन आभार मानले.

‘कॅम्पस’ला आजपासून सुट्टया- शैक्षणिक विभागांना ८ ते २२ नोव्हेंबर या काळात तर प्रशासकीय विभागांना १० ते १६ नोव्हेंबर दरम्यान दीपावलीच्या सुट्टया जाहीर करण्यात आल्या आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी यंदा पहिल्यांदाच शैक्षणिक सत्र सुरु होण्यापूर्वीच ’अ‍ॅकॅडमिक कॅलेंडर’ जाहीर केले. विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस व धाराशिव कॅम्पसमधील पदव्युत्तर शैक्षणिक विभागांना हे वेळापत्रक लागू असणार आहे.

या वेळापत्रकानूसार १५ जून ते ७ नोव्हेंबर दरम्यान प्रथम सत्र होते. तर ८ ते २२ नोव्हेंबर दरम्यान दिपावली सुट्टया जाहीर करण्यात आल्या आहेत. मुख्य कॅम्पस व सब कॅम्पस मधील सर्व प्रशासकीय विभागांना १० ते १६ नोव्हेंबर अशी सात दिवस सुट्टी राहील. या काळात मुख्य प्रशासकीय इमारतीसह सर्व प्रशासकीय कार्यालयांना सुट्टी राहील, असे कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी कळवले आहे.

Back to top button
error: Content is protected !!