छत्रपती संभाजीनगर
Trending

विद्यापीठाला दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर, प्रशासकीय विभागांत सात दिवस सुट्टी !

छत्रपती संभाजीनगर, दि.४ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शैक्षणिक विभागांच्या ८ ते २२ नोव्हेंबर या काळात दीपावलीच्या सुट्टया जाहीर करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा यांनी दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी यंदा पहिल्यांदाच शैक्षणिक सत्र सुरु होण्यापूर्वीच ’अ‍ॅकॅडमिक कॅलेंडर’ जाहीर केले. विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस व धाराशिव कॅम्पसमधील पदव्युत्तर विभागांना हे वेळापत्रक लागू असणार आहे. या वेळापत्रकानूसार १५ जून ते ७ नोव्हेंबर दरम्यान प्रथम सत्र होते. तर ८ ते २२ नोव्हेंबर दरम्यान दीपावली सुट्टया जाहीर केल्या. तर २३ नोव्हेंबर ते २ मे या काळात द्वितीय सत्र पार पडेल. तर ३ मे २०२४ पासून उन्हाळी सुट्टया राहतील, असेही डॉ.गणेश मंझा यांनी कळविले आहे.

प्रशासकीय विभागांत सात दिवस सुट्टी
मुख्य कॅम्पस व सब कॅम्पस मधील सर्व प्रशासकीय विभागांना १० ते १६ नोव्हेंबर अशी सात दिवस सुट्टी राहील. या काळात मुख्य प्रशासकीय इमारतीसह सर्व प्रशासकीय कार्यालयांना सुट्टी राहील, असे कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी कळवले आहे.

Back to top button
error: Content is protected !!