छत्रपती संभाजीनगर
Trending

डॉ. दीपक मसलेकर यांना मारहाण ! रुग्ण तापासत असताना केबिनमध्ये घुसून लोखंडी कड्याने कपाळावर मारले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २४ – रुग्णांची तपासणी करत असताना सुरुवातीला दोघे व त्यापाठोपाठ अजून दोघे केबिनमध्ये घुसले. शिवीगाळ करत डॉ. दीपक निळकंठ मसलेकर यांना मारहाण केली. चौघांपैकी एकाने लोखंडी कड्याने कपाळावर वार केला. यात ते जखमी झाले. ही घटना रात्री ८.३० वाजेदरम्यान हॉटेल कार्तिकी शेजारी, शाग्रीला कॉम्पेलक्स, श्रीकृष्ण मेडीकलच्या खाली छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या दवाखान्यात घडली.

डॉ. दीपक निळकंठ मसलेकर (वय 67 वर्षे धंदा-वैद्यकीय व्यवसाय रा. सिडको N-9 बळीराम पाटील शाळा ते आंबेडकर नगर चौक जवळ छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, त्वचा रोगतज्ञ डॉक्टर म्हणून हॉटेल कार्तिकी शेजारी, शाग्रीला कॉम्पेलक्स, श्रीकृष्ण मेडीकलच्या खाली छत्रपती संभाजीनगर येथे दवाखाना चालवतात.

दि 22/06/2023 रोजी रात्री 08.30 वाजेच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती हे डॉ. दीपक निळकंठ मसलेकर यांच्या दवाखाण्यात आले. अचानक कॅबिनमध्ये घुसले. पेशंट तपासत असल्यामुळे तुम्ही असे अचानक कॅबिनमध्ये कसे घुसता, मी पेशंट बघत आहे असे डॉ. दीपक निळकंठ मसलेकर यांनी त्यांना संगितल्यावर त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरवात केली.

त्यांच्या पाठोपाठ अजून दोन अनोळखी आले ते देखील शिवीगाळ करत म्हणू लागले, “तू कस काय आम्हाला रस्त्यावर थांबु नको असे म्हणतो. हा दवाखाण्याच्या समोरचा रस्ता तुझ्या बापाचा आहे काय? तू का आम्हाला शिस्त शिकवितो का ?” “तेव्हा डॉ. दीपक निळकंठ मसलेकर हे त्यांना तुम्ही नेमके काय म्हणत आहे मला काही समजून येत नाही”. असे म्हणताच त्या चौघांनी डॉ. दीपक निळकंठ मसलेकर यांना हाताचापटाने मारहाण करण्यास सुरवात केली.

त्या चौघांपैकी एकाच्या हातात असलेल्या लोखंडी कड्याने डॉ. दीपक निळकंठ मसलेकर यांच्या कपाळावर मारले. त्यामुळे डॉ. दीपक निळकंठ मसलेकर यांच्या डोक्यातून रक्त येवू लागले. दवाखान्यात आलेले सर्व पेशंट व मेडीकल वाले तसेच काम्पलेक्समधील लोक हे जमले. जमावाला पाहून चौघेही तेथून पळून गेले. मारहाण करणारे साधारण 25 ते 35 या वयोगटातील पुरुष असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी डॉ. दीपक निळकंठ मसलेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार हल्लेखोरांवर क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ठुबे करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!