छत्रपती संभाजीनगर
Trending

महावितरणच्या पथकास शिवीगाळ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल ! बारापुल्ला गेट परिसरात थकबाकीदारांची पुरवठा खंडित करण्याची मोहीम !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २० -: वीजबिल वसुलीस गेलेल्या महावितरणच्या पथकास शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीजबिल थकबाकी वसुली करण्यासाठी महावितरणची मोहीम सुरू आहे. बिल न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा या मोहिमेत खंडित केला जात आहे. २० मार्च रोजी सायंकाळी ५.१० वाजता महावितरणच्या पॉवर हाऊस उपविभागाचे कर्मचारी बारापुल्ला गेट येथे वसुलीसाठी गेले असता थकबाकीमुळे त्यांनी आरोपी विजेंद्र सोनवणे याचा वीजपुरवठा खंडित केला.

यामुळे आरोपी विजेंद्र सोनवणेसह त्याच्या आईवडलांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणला. बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचारी शेख नवाब यांच्या फिर्यादीवरून आरोपी विजेंद्र सोनवणे व त्याचे आईवडील अशा तिघांवर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!