वीज दरवाढीचे संकट लादू नका, वीज दरवाढ तात्काळ मागे घ्या अन्यथा लोक रस्त्यावर उतरणार !
राष्ट्रवादीचे नेते अधिवेशन संपल्याच्या दुसर्याच दिवशी फिल्डवर.....राष्ट्रवादी महाराष्ट्रातील जनतेसोबत - महेश तपासे
- सभागृहात मंत्रीच उत्तर द्यायला नाहीत ;अजितदादांनी केली पोलखोल...
- मुंबईतील 'युवा मंथन, वेध भविष्याचा' या शिबिराला आदरणीय शरद पवार उपस्थित राहणार...
- बिल्कीस बानो बलात्कारातील आरोपी सरकारी कार्यक्रमात व्यासपीठावर ;ही दुर्दैवी घटना, निषेध...
- खासदारकी लगेच रद्द होते मग,लोकप्रतिनिधी कायद्याच्या आधारावर शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवीवर कारवाई कधी...
मुंबई दि. २७ मार्च – राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वसामान्य शेतकऱ्यांसोबत… सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत… जनतेसोबत बांधिलकी असल्यानेच राष्ट्रवादीचे नेते अधिवेशन संपल्याच्या दुसर्या दिवशीच फिल्डवर पोचले याचा अर्थ राष्ट्रवादी महाराष्ट्रातील जनतेसोबत आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान, देशात वाढत्या महागाईमुळे राज्यातील जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे त्यातच महाराष्ट्र आधीच अनेक संकटातून जात असताना नव्याने प्रस्तावित वीज दरवाढीचे संकट सरकारने राज्याच्या जनतेच्या माथी लागू नये अन्यथा लोक रस्त्यावर येतील असा इशारा महेश तपासे यांनी यावेळी केली.
शनिवारी विधीमंडळाचे कामकाज संपले आणि दुसर्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे चार दिवसांच्या उत्तर महाराष्ट्राच्या तर विरोधी पक्षनेते अजित पवार हे मराठवाडा दौर्यावर जनतेच्या दारात समस्या ऐकून घेण्यासाठी दाखल झाले आहेत असेही महेश तपासे म्हणाले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्य लोकांच्या मांडलेल्या प्रश्नावर मंत्र्यांनी उत्तर देणे अपेक्षित होते मात्र उत्तर देताना मंत्रीच गैरहजर होते हे चित्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्रासमोर आणले आहे हेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.
२ एप्रिल २०२३ रोजी महाविकास आघाडीची जाहीर सभा छत्रपती संभाजी नगर येथे होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी ती यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत व सभेला राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती असेल.
बुधवार दिनांक २९ मार्च २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता चेंबूर येथे मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने होणार्या ‘युवा मंथन, वेध भविष्याचा’ या शिबिराला ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात आगामी मुंबई मनपा निवडणुकीबाबत पवारसाहेब मार्गदर्शन करतील. युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या पवारसाहेबांना ऐकण्यासाठी हजारो युवक उपस्थित राहतील असेही महेश तपासे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द केल्यानंतर आता त्यांच्या रद्द करण्यात आलेल्या खासदारकीबाबत सुप्रीम कोर्टात उद्यापासून सुनावणी होणार आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचीही खासदारकी लोकसभा अध्यक्षांनी लोकप्रतिनिधींचा कायद्याचा आधार घेऊन रद्द केली आहे. मात्र राज्यात शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांना अलिबाग कोर्टाने दोन वर्षाची सजा सुनावली असताना याच कायद्याचा आधार घेऊन त्यांची आमदारकी का रद्द करण्यात येत नाही असा सवालही महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे.
देशात वाढत्या महागाईमुळे राज्यातील जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे त्यातच महाराष्ट्र आधीच अनेक संकटातून जात असताना नव्याने प्रस्तावित वीज दरवाढीचे संकट सरकारने राज्याच्या जनतेच्या माथी लागू नये अन्यथा लोक रस्त्यावर येतील असा इशारा महेश तपासे यांनी यावेळी केली.
ई – गव्हर्नेसचा फार मोठा गाजावाजा केला जातो आहे मात्र यातील सुमारे ६८ टक्के सेवा सुरू नाहीत असा एक सर्व्हे समोर आला आहे. ई गव्हर्नेसची सुविधा सेतूच्या माध्यमातून दिली जाते त्यामुळे ती १०० टक्के कार्यान्वित असली पाहिजे अशी मागणीही महेश तपासे यांनी केली.
बिल्कीस बानो यांच्यावरील बलात्कारातील आरोपी गुजरात सरकारच्या शासकीय कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित राहतो हे दुर्दैवी असून या घटनेचा महेश तपासे यांनी निषेध केला आहे.
आपण कायद्यावर विश्वास ठेवून असतो आणि दुसरीकडे सरकारकडून अपेक्षा असते की अशा व्यक्तींना सार्वजनिक जीवनात जवळ करता कामा नये परंतु गुजरात सरकारमध्ये राजकारण सुरू आहे. एवढी संवेदनशीलता गुजरात सरकारने दाखवायला हवी होती मात्र ती दाखवली नाही याबद्दल महेश तपासे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले आदी उपस्थित होते.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe