शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत वर्ग ३ व ४ कर्मचारी पदभरती करणार !
इतर राज्यातील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी आकर्षित होतील अशी सुस्थिती निर्माण करावी- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि. १० : “शासकीय वैद्यकीय, आयुष आणि दंत महाविद्यालयांच्या इमारती अधिक सुसज्ज, दर्जेदार कराव्यात व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. इतर राज्यांतील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी आकर्षित होतील अशी सुस्थिती निर्माण करावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. रिक्त पदे १०० टक्के भरण्यात आली असून, वर्ग ३ व ४ कर्मचारी एक महिनाभरात पदभरती करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय, आयुष आणि दंत महाविद्यालयातील अधिष्ठाता यांच्याकडून रुग्णालय आणि महाविद्यालयांचा आढावा बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आली होती, यावेळी मंत्री मुश्रीफ बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील गरीब व गरजूंना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासकीय महाविद्यालये व रुग्णालयांत औषध आणि साहित्यासाठी निधी कमी पडू देणार नाही.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत गुणवत्तेनुसार साधारण परिस्थिती असणारे विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांना चांगल्या प्रकारचे सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकांची संख्या वाढावी यासाठी त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये वाढ करण्यात यावी. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील समस्या व नवीन सुधारणांचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. रिक्त पदे १०० टक्के भरण्यात आली असून, वर्ग ३ व ४ कर्मचारी एक महिनाभरात पदभरती करण्यात येईल. त्यामुळे आरोग्यसेवा अधिक प्रभावी होणार आहे. महाविद्यालये आणि रुग्णालये स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी अधिष्ठातांना केल्या.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण व आयुष्यचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ.अजय चंदनवाले, आयुष्य संचालनालयाचे संचालक डॉ.वैद्य रामन घुंगळेकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे यांच्यासह राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता उपस्थित होते.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe