छत्रपती संभाजीनगर
Trending

रांजणगावमध्ये उद्योजकास बेशुद्ध होईस्तोवर मारहाण: आम्ही डुक्कर पाळतो, नादी लागू नका ! आज तुला देवाघरीच पाठवतो, ठारच मारतो !!

कर्णकर्कश हॉर्न वाजवण्यावरून वाद

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ – कर्णकर्कश हॉर्न वाजवू नका असे म्हणताच मोटारसायकलवरील दोघांनी टोकदार वस्तूने उद्योजकास बेशुद्ध होईस्तोवर मारहाण केली. ही घटना सायंकाळी के ४८ रोडवरील रांजणगाव परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून बाहेरून आलेले नवउद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील (वय ३४, रा. विटखेडा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे जखमीचे नाव आहे. अरूण मासुळे (वय ३१), किशोर नावाचा त्याचा मित्र (दोघे रा. दत्तनगर, राजंनगाव, ता गुंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

जखमी उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि 03/11/2023 रोजी सायंकाळी सुमारे 05.15 ते 05.30 वाजेदरम्यान फिर्यादी उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील हे काम आटोपून नेहमीप्रमाणे मित्रांसोबत k-48 रोडवरील जवळच असलेल्या एका चहाच्या दुकानावर चहा पिताना चर्चा करीत होते. उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील यांच्या सोबत त्यांचे मित्र 1) योगेश जंगले 2) कृष्णा भोसले 3) अतुल राठोड 4) दिगांबर काथार चहा पित असताना नविन प्रोजेक्टवर चर्चा करत होते. त्याचवेळी फिर्यादी उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील यांना एक महत्वाचा फोन काँल आल्याने ते थोडं बाजुला जावून फोनवर बोलत होते.

याचवेळी रोडने एका मोटारसायकलवर दोघे जण येत होते. ते जोरजोरात कर्कश हॉर्न वाजवत आले असता, त्यांच्या हॉर्नच्या कर्कश आवाजाने फिर्यादी उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील यांना फोनवर बोलताना डिस्टर्ब झाले. त्यामुळे त्यांनी त्यास थांबवून विचारले की, ” इतक्या जोरात का हॉर्न वाजवतो “? त्यावर तो थांबला असता मोटारसायकलचा नंबर MH 20 EL 3599 असा दिसला.  त्यावेळी त्याने थांबून फिर्यादी उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील यांच्याशी हुज्जत घालून म्हणाला की, माझ्या गाडीचा नंबर काय बघतो, आम्ही मूळ इथले रांजणगावचे व तुम्ही कुठून कुठुन इथे येवून कंपन्या टाकून पोट भरता, व वरून आम्हालाच जाब – विचारता का? माझे नाव अरुण मासुळे आहे.

आम्ही डुक्कर पाळतो आमच्या नादी लागू नका नाहीतर तुला डूकरा सारखाच कापून टाकील ” त्यावर फिर्यादी उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील यांनी त्यास तेथून जाण्यास सांगितले असता, तो म्हणाला की, ” मी का जावू, आज तुला दाखवतोच, तुच थांब” असे म्हणून त्याच्या सोबतचा त्याच्या मित्रास त्याने बोलताना म्हणला की, किशोर हा आपल्याशी डोक लावतोय पकड याला आज याला दाखवून देवु आपण कोण आहेत असे म्हणुन त्याने त्याच्या गाडीला लावलेली काहीतरी टोकदार वस्तू काढून त्याच्या मित्राने फिर्यादी उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील यांना पकडून अरुणने ” आज तू तर गेला, तुला देवाघरीच पाठवतो, ठारच मारतो “असे म्हणून त्याच्या हातातील टोकदार वस्तु डोक्यात दोन वेळेस मारली.

त्यात फिर्यादी उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील हे जखमी झाले. डोक्यातून रक्त येवु लागल्याने ते जोरात ओरडल्याने जवळच असलेले त्यांचे मित्र योगेश, कृष्णा व दिगांबर यांनी येवून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते आलेल्या मोटारसायकल वरून पळून गेले. नंतर जखमी उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील हे बेशुद्ध झाले. शुद्धीवर आले तेव्हा ते घृष्णेश्वर हॉस्पिटलमध्ये असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना त्यांच्या मित्रानी येथे आणून दाखल केल्याचे समजले. तेथे डॉरक्टरांनी प्रथमोचपार करून नंतर जखम मोठी असल्याने सिटी स्कॅन करणेसाठी दुसरीकडे घेवून जाण्याचे सांगितले. मित्र व नातेवाईकांनी त्यांना नंतर सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे आय.सी.यु. वॉर्डात त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

याप्रकरणी उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरू अरूण मासुळे (वय ३१), किशोर नावाचा त्याचा मित्र (दोघे रा. दत्तनगर, राजंनगाव, ता गुंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर 922/2023 कलम 307, 34 नुसार एम वाळुज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि पाथरकर करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!