छत्रपती संभाजीनगर
Trending

छत्रपती संभाजीनगरात गोळीबार, ठाकरे नगरातील दुकानात जबरी चोरीसाठी केली फायरिंग, घाबरून दुकानदाराने आतून शटर लावले !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ११ – चल पैसे निकाल… जितना पैसा है उतना निकाल असे दुकानदाराला धमकावून गोळीबार करून दहशत निर्माण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे नगरमध्ये रात्रीच्या सुमारास घडली. दुकानदाराने समयसूचकता दाखवून तातडीने आतून शटर बंद केल्याने पुढील अनर्थ टळला मात्र या घटनेमुळे परिसरातील व्यापार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, गोळीबार करून ते दोघे ओनोळखी स्विफ्ट कारने एपीआय कॉर्नरच्या दिशेने पसार झाले.

विलास रामराव राठोड (वय 25 वर्षे व्यवसाय – मल्टीसर्विसेस, रा.बी.एच-1/91 ठाकरे नगर एन -2 भवानी पेट्रोलपंपाच्या मागे एपाआय कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर) याच्या दुकानात हा प्रकार घडला. विलास रामराव राठोड याने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, शुभ मल्टीसर्विसेस नावाचा त्याचा व्यवसाय आहे. दि. 10/03/2023 रोजी रात्री 08.45 वाजेच्या सुमारास विलास रामराव राठोड याच्या दुकानावर वरझडी येथील ग्राहक हा त्याचे मतदान कार्ड काढण्यासाठी आलेला होता.

विलास रामराव राठोड हा त्याचे काम करत असताना एक अनोळखी युवक (वय अंदाजे 20 ते 22 वर्षे) दुकानात आला. त्याच्या हातात पिस्टल होती. तो विलास रामराव राठोड याच्याकडे बघून “चल पैसे निकाल… जितना पैसा है उतना निकाल” असे म्हणाला. त्याने दुकानातील पिंटरवर त्याच्या पिस्टलमधून गोळी झाडली. तेव्हा विलास रामराव राठोड हा काउंटरच्या आडोशाला लपला. त्यानंतर तो दुकानाच्या बाहेर गेला व परत दुकानात आला व पुन्हा विलास रामराव राठोड यास शिविगाळ करून पैसे मागू लागला.

त्यामुळे विलास रामराव राठोड याने त्याला 200 रुपये दिले. त्यांने ते पैसे दुकानातील टेबलवर फेकले आणि इतना नही और पैसा निकाल असे म्हणून बाहेर निघून गेला. त्यानंतर विलास रामराव राठोड याने समयसूचकता दाखवून काउंटवरून उडी मारून दुकानाचे शटर आतून बंद केले.

त्यानंतर विलास रामराव राठोड याने त्याच्या दुकाणासमोरील त्याच्या ओळखीतील एकाला कॉल करून ते कोण होत ते गेले का ? असे विचारले असता त्यांनी ते गेल्याचे सांगितले. तेव्हा विलास रामराव राठोड याने आतून लावलेले दुकानाचे शटर उघडले व बाहेर आला.

दरम्यान, विलास रामराव राठोड याच्याकडे कलेक्शन करीता येत असलेल्याने त्याला सांगितले की तो विलास रामराव राठोड याच्या दुकानातून कलेक्शन करून समोरील दुकानाकडे जात असताना त्याला दुकानाबाहेर दोन जण उभे दिसले त्यानंतर तो समोरच्या दुकानात गेल्यावर त्याला फायरींगचा आवाज आल्याने त्याने पाहिले की एक जण पिस्तुल घेऊन दुकानाच्या बाहेर आला व त्याने लावलेल्या गाडीचे काचेवर ठोकून त्याचा भाऊ गाडीच्या बाहेर न आल्याने तो तेथून दुकानाच्या पुढे लावलेल्या स्विफ्ट गाडीमध्ये बसून ते दोन जण एपीआय कॉर्नरच्या दिशेने निघून गेले.

विलास रामराव राठोड याने दिलेल्या तक्रारीवरून दोन अनोळखींवर मुकुंदवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!