महाराष्ट्र
Trending

गोळीबाराने बीड शहर हादरले, भाकरी मागितली म्हणून छातीवर गोळी झाडली !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २- खाण्यास भाकरी मागितली म्हणून छातीवर गोळी झाडल्याची खळबळजनक घटना बीड शहरातील पात्रुड गल्लीत मध्यरात्रीच्या सुमारास घडली. जखमी युवकावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, मध्यरात्री घडलेल्या या गोळीबाराने बीड शहरातील पात्रुड गल्ली हादरून गेली आहे.

मनोज दत्ता जाधव (वय 30 वर्षे धंदा मजुरी रा. पात्रुड गल्ली जि. बीड) असे गोळीबारात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. सरकारी दवाखाना, अपघात विभाग बीड येथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. रितेश विलास गायकवाड असे आरोपीचे नाव आहे.

जखमी मनोज दत्ता जाधव याने पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दिनांक 02/10/2023रात्री 00.15 वाजेच्या सुमारास मनोजची आत्या सुदा प्रताप गायकवाड (रा. पात्रुड गल्ली जि. बीड) यांच्या घरासमोर असताना मामाचा मुलगा रितेश विलास गायकवाड यास मनोज दत्ता जाधव याने  खाण्यास भाकरी मागितली असता त्याने त्याच्या जवळील बंदुकीने मनोजच्या छातीवर डाव्या बाजुस खांद्याजवळ गोळी मारून जखमी केले.

जखमी अवस्थेत मनोजला वडील दत्ता तुकाराम जाधव यांनी व गल्लीतील लोकांनी अॅम्बुलन्स मध्ये सरकारी दवाखाना जि. बीड येथे दाखल केले. जखमी मनोज दत्ता जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून रितेश विलास गायकवाड बीड शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!