छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्रवैजापूर
Trending

वैजापूर, शिल्लेगाव व बीड जिल्ह्यातून गाड्या चोरणारी टोळी जेरबंद, जालन्यातून आरोपीसह गाड्या जप्त ! लासूरगाव परिसरातून चोरीस गेलेली क्रूझर पोलिसांनी हुडकून काढली !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २५ – वाहन चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली. शिर्डीतून आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याचे साथिदार जालन्यातून पकडण्यात आले. जालन्यातील साथीदारांने लपवून ठेवलेल्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. टोळीतील म्होरक्यावर तब्बल ४२ चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या टोळीकडून 8,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले.

दिनांक २४ / १० / २०१३ रोजी गणेश भीमराव गाडे (वय ४५ वर्षे रा. लासूरगाव रोड) यांनी शिल्लेगाव पोलिस ठाणे येथे तक्रार दिली की, दिनांक २२ / १० / २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास त्यांची फोर्स क्रुझर जिप क्रमांक एम.एच. २० डि.व्ही. ००६२ ही त्याच्या राहते घरा समोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गाड्या चोरीच्या गुन्हयांचा पोलीस ठाणे शिल्लेगाव यांच्या सोबत स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करित असताना सतीश वाघ, पोलीस निरीक्षक यांना गोपनीय बातमीदारा मार्फेत माहिती मिळाली की, हा गुन्हा शिर्डी येथील संतोष उर्फ गणेश शंकर शिंदे यांने केला आहे.

यावरुन स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकांने तात्काळ शिर्डी येथे जावून कालीकानगर परिसरात सापळा लावला. तेथे संशयित संतोष उर्फे गणेश शंकर शिंदे हा फिरतांना आढळून आल्याने पथकांने त्याच्यावर अचानक झडप घालून त्यास ताब्यात घेतले. त्यास चोरीच्या वाहना बाबत विचारपूस करता तो पोलिसांना उडवा उडवीचे उत्तरे देवू लागल्याने त्याच्यावर अधिक संशय बळावला. त्यास विश्वासात घेवून विचारपूस करता त्यांने ती गाडी ही त्याचे साथीदार साईनाथ रघुनाथ कचरे व परमेश्वर भीमराव अंभोरे यांच्या साथीने चोरी केली असून ती जालना येथे लपवून ठेवल्याची कबुली दिली.

यावरुन पथकाने तातडीने शिर्डी येथील साईनगर मधून साईनाथ रघुनाथ कचरे यास शिताफिने ताब्यात घेतले तसेच जालना येथील चंदिनझिरा परिसरात तिसरा आरोपी परमेश्वर भीमराव अंभोरे हा पोलिसांना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून गाडीबाबत विचारपूस करता त्यांने चोरी केलेली गाडी जालना येथील भवानी नगर परिसरात लपवून ठेवल्याचे सांगितले. यावरून भवानीनगर परिसराची पोलीसांनी कसून पाहणी केली असता तेथे या टोळीने चोरी केलेल्या तीन गाड्या ज्यात दोन क्रुझर जीप व एक लोडींग पिकअप असा एकूण किंमत 8,10,000/- मुद्देमाल मिळून आला.

या टोळीने पोलीस ठाणे वैजापूर, शिल्लेगाव, नेकनूर जि.बिड येथून सुध्दा वाहने चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले असून यातील सराईत आरोपी संतोष उर्फे गणेश शंकर शिंदे (रा. शिर्डी) यांच्यावर आतापर्यंत जालना, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर येथे चोरीचे 42 गुन्हे दाखल आहेत.

आरोपी नामे १) संतोष उर्फे गणेश शंकर शिंदे वय २८ वर्षे रा. कालीकानगर शिर्डी ता. राहता जि. अहमदनगर २) साईनाथ रघुनाथ कचरे वय २३ वर्षे रा. साईनगर शिर्डी, ता. राहता जि. अहमदनगर ३) परमेश्वर भीमराव अंभोरे वय २८ वर्षे रा. चंदनझिरा, जालना यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून अधिक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील तपास शिल्लेगाव पोलिस करित आहेत.

ही कारवाई मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश वाघ, पोलिस निरीक्षक, भगतसिंग दुल्हत, पोलिस उपनिरीक्षक, पोलिस अंमलदार नामदेव सिरसाठ, दीपेश नागझरे, संजय घुगे, वाल्मिक निकम, अशोक वाघ, दीपक सुरोसे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, संजय तांदळे यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!