छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

हर्सूल टी पॉईंट ते विमानतळ रस्त्याची प्रशासकांकडून पाहणी ! व्हर्टिकल गार्डन, हॉटेल्स व झाडांवर विद्युत रोषणाई करण्याचे निर्देश !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २१ फेब्रुवारी – G-20  परिषदेसाठी येणारे प्रतिनिधी आणि पाहुणे ये जा करण्यासाठी ज्या रस्त्यांचा वापर करणार आहे त्या रस्त्यांवरील सर्व मोठ्या आणि जुन्या झाडांवर विद्युत रोषणाई करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी दिले.

दिनांक 20  फेब्रुवारी रोजी प्रशासक अभिजीत चौधरी यांनी रात्री नऊ वाजता विमानतळ ते हर्सूल टी पॉइंट पर्यंत G-20 निमित्त करण्यात आलेल्या सौंदर्यकरण कामांची पाहणी केली. सुमारे तीन तास चाललेल्या पाहणी दौऱ्यात प्रशासक अभिजीत चौधरी यांनी प्रत्येक कामाचा बारकाईने आढावा घेतला.

यावेळी विमानतळ, हर्सूल टी पॉईंट आणि ताज हॉटेल ते बीबी का मकबरा पर्यंत जुने आणि वापरात नसलेले बस थांबे त्वरित काढून घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच ठिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या व्हर्टिकल गार्डनला देखील रोषणाई करण्याचे निर्देश दिले.

यावेळी प्रशाशक अभिजीत चौधरी म्हणाले की हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून दिनांक २६ ते २८ फेब्रुवारी पर्यंत त्यांना आपापल्या हॉटेलवर  विद्युत रोषणाई करण्याचे आवाहन करावे. याशिवाय झाडांची छटाई झालेल्या कामांचा कचरा  उचलणे आणि रस्त्यांवर लावण्यात येणारे G-20 बाबत फ्लेक्स पुरेसे प्रमाणात राखीव मध्ये ठेवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त बीबी नेमाने, रवींद्र निकम, शहर अभियंता ए बी देशमुख, कार्यकारी अभियंता बी डी फड, डी के पंडित, राजू संधा, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील तसेच संबंधित वार्ड अधिकारी आणि वार्ड अभियंता आदींची उपस्थिती होती.

Back to top button
error: Content is protected !!