डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व महाविद्यालयांतील सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद !
लेखी पत्र न मिळाल्याने बेमुदत संप सुरुच, विद्यार्थी, प्राध्यापकांच्या दहा संघटनांचा पाठिंबा
संभाजीनगर लाईव्ह, दि.२१ : महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या संपाला विद्यार्थी, प्राध्यापकांच्या दहा संघटनांनी आतापर्यंत पाठिंबा जाहीर केला. उद्यापासून अधिक तिव्रतेने बेमुदत संप करण्यात येणार आहे, अशी माहिती कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील ४२ हून अधिक विभागातील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोजन लागू केला. मात्र १३ विद्यापीठे व अनुदानित महाविद्यालयांना सापत्न वागूणक दिली आहे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर आहेत.
दरम्यान, पहिल्या दोन दिवसात ‘बामुक्टो’ प्राध्यापक संघटनेचे नेते तथा अधिसभा सदस्य डॉ.विक्रम खिल्लारे, डॉ.उमाकांत राठोड, डॉ.मारुती तेगमपुरे यांनी कर्मचारी यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला. तसेच बामुटाचे डॉ.राम चव्हाण, डॉ. भास्कर साठे, डॉ. चंद्रकांत कोकाटे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, विद्या परिषद सदस्य डॉ.राजेश करपे, विद्यार्थी आंदोलनचे डॉ.प्रकाश इंगळे, महासंघाचे डॉ.भारत खंदारे, राष्ट्रवादी युवकचे डॉ दत्ता भांगे, लोकसंवाद प्रतिष्ठानचे डॉ.गणेश मोहिते, महाविद्यालयीन कर्मचारी संघटनेचे मेघराज पंडित, माजी अधिसभा सदस्य गणी पटेल, संस्थाचालक संघटनेचे साईनाथ जाधव, कास्ट्राईब संघटनेचे नंदू खोब्रागडे यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला.
सहसंचालक डॉ.सुरेंद्र ठाकूर यांनी राज्य शासन आपल्या मागण्या बाबत सकारात्मक असून संप मागे घ्यावा, असे आवाहन केले. शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या एकाही मागणीवर ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही. त्यामुळे संपाचा निर्धार कायम ठेवण्यात आला आहे. या प्रमुख मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही शासनाने कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे २२ फेब्रुवारीपासून हा संप आणखी तीव्र करण्यात येणार आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe