गंगापूरपैठण
Trending

एकाने रुमालाने गळा आवळला दुसऱ्याने गळ्यावर पाय ठेवून मोबाईलमध्ये फोटो काढून ठार मारले ! गंगापूर तालुक्यातील खूनाचा ३६ तासांत उलगडा, पैठणचा आरोपी जेरबंद !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – एकाने रुमालाने गळा आवळला तर दुसऱ्याने गळ्यावर पाय ठेवून मोबाईलमध्ये फोटो काढून ठार मारले. पोलीस ठाणे गंगापूर हद्यीतील पेंढापृूर शिवारात ऊसाच्या शेतात खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेकडून ३६ तासांच्या आत पर्दाफाश करण्यात आला.

अक्षय बापुसाहेब विर (वय २१ वर्ष रा. पान रांजणगांव (खुरी) ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक ०२/०१/२०२३ रोजी नितीन प्रकाश जमधडे (वय २९ वर्षे, व्यवसाय शेती रा. पाटोदा ता.जि. औरंगाबाद) यांनी पोलीस ठाणे गंगापूर येथे फिर्याद दिली की, त्यांचा मोठा भाऊ सुनील जमधडे हा त्याची मुले व पत्नी सोबत शरणापूर येथे राहत होता. तो एम.आय.डी.सी कार्यालय रेल्वे स्टेशन रोड औरंगाबाद येथे कर्मचारी पदावर काम करत होता.

दिनांक ०२/०१/२०२३ रोजी पाटोदा गावाचे पोलीस पाटील लहू मुचक यांनी माहिती दिली की, सुनीलचा ढोरेगांव येथे खून झाल्याची माहिती मिळाली असून ढोरेगांव जवळील पेंढापूर फाटयाच्या मागील ऊसाच्या शेतात त्याचा मृतदेह पडलेला आहे. त्यावरून नातेवाईकां सोबत पेंढापूर जवळील फौजी ढाब्याच्या मागील पेंढापूर जाणारे रोडलगत ऊसाच्या शेतात जावून पाहिले असता ऊसाच्या वाढयाच्या खाली मोठा भाऊ सुनील जमधडे याचे प्रेत आढळून आले. या आशयाच्या फिर्यादीवरुन पोलीस ठाणे गंगापूर येथे गु.र.नं ०३ / २०२३ कलम ३०२, २०१ भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असताना त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून व तांत्रीक विश्लेषणावरून खात्रीलायक माहिती मिळाली की, मृत सुनील प्रकाश जमधडे हा दिनांक ०१/०१/२०२३ रोजी १७:३० वाजे दरम्यान पंढरपूर येथील विरांश वाईन शॉप येथे पान रांजणगांव (खुरी) ता. पैठण येथील अक्षय बापूसाहेब विर व त्याच्या सोबतच्या एका अनोळखीसोबत दारु विकत घेवून पिण्यासाठी गेला होता.

ही खात्रीलायक माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अक्षय बापुसाहेब विर (वय २१ वर्ष रा. पान रांजणगांव (खुरी) ता. पैठण) याचा त्याच्या राहते गावी शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली दिली. दिनांक ०१/०१/२०२३ रोजी १७:३० वाजता तो व त्याचा मित्र मृत सुनील जमधडे यास भेटले व त्याचेकडील मोटार सायकल व पैसे घेण्यासाठी त्यास पंढरपूर येथील विरांश वाईन शॉप येथून दारु विकत घेतली. त्यास दारु पाजून त्याच्या मोटार सायकलवर ढोरेगांव येथे जेवणासाठी जात असताना रस्त्यात भांडण झाले.

तेव्हा सुनील जमधडे यास काठीने मारहाण केली. त्यानंतर त्यास ढोरेगांव ते पेंढापूर रोडलगत फौजी ढाब्याच्या पाठीमागे एका ऊसाच्या शेतात घेऊन गेलो व माझ्या मित्राने त्याचा रुमालाने गळा आवळला व मी त्याच्या गळ्यावर पाय ठेवून माझे मोबाईल मध्ये त्याला मारत असतांनाचे फोटो काढले. माझ्या मित्राने सुनील जमधडे याची ओळख पटू नये म्हणून त्याच्या तोंडावर दगडाने मारुन त्याचा चेहरा विद्रुप करून त्यास जिवे ठार मारले, अशी कबुली दिल्याने आरोपीस सदर गुन्हयाच्या पुढील तपासकामी पोलीस ठाणे गंगापूर यांच्या ताब्यात देण्यांत आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस ठाणे गंगापूर हे करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग गंगापूर प्रकाश बेले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोउपनि प्रदीप दूबे, सय्यद झिया, सफी दगडू जाधव, पोह लहू थोटे, नामदेव सिरसाठ, श्रीमंत भालेराव, दिपेश नागझरे, संजय घुगे, पोना दीपक सुरोसे, उमेश बकले, वाल्मीक निकम, संतोष डमाळे, पोकों ज्ञानेश्वर मेटे, रामेश्वर थापसे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, संजय तांदळे व पोलीस ठाणे एम. पैठण येथील पोह गणेश खंडागळे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!