गंगापूरछत्रपती संभाजीनगर
Trending

गंगापूर शिवारातील सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड ! कन्नड, औरंगाबादचे नामांकित ११ जण ३६ लाखांच्या मुद्देमालासह ताब्यात !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – तब्बल ११ एकर शेत. या सर्व शेतीला तारांच काटेरी कुंपन. या शेतीत जाण्यासाठी केवळ एकच गेट. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या गेट परिसरात देखरीखीसाठी एक जण. अगदी डोळ्यात तेल घालून आजुबाजुच्या परिस्थीतीवर खास करून पोलिसांवर या व्यक्तीचे लक्ष असायचे. पोलिसांची कुणकुण लागली की इशारा देऊन पत्ते खेळणार्यांना सावध करायचे, अशी सर्व टाईट फिल्डिंग भेदून पोलिसांनी अखेर गंगापूर शिवारातील सर्वात मोठा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. पोलीस ठाणे गंगापूर हद्यीतील श्रीकृष्णनगर, गंगापूर शिवारातील शेतातील कांद्याच्या चाळीत सुरू असलेला जुगाराचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. अकरा आरोपींच्या ताब्यातून 36,88,930/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ११ एकर शेतीला घेराबंदी करून पोलिसांनी धाड टाकली. चार जण अंधाराचा फायदा घेऊन पळाले तर ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दिनांक 16/5/23 रोजी गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, गंगापूर हद्यीतील ज्ञानेश्वर रंगनाथ यादव (रा. श्रीकृष्णनगर, गंगापूर) याचे शेतातील 3000 स्क्वे.फुटाच्या पत्र्याच्या शेडमधील कांद्याच्या चाळीमध्ये अवैधरित्या जुगार अड्डा चालू आहे. या माहितीवरून पोलीस अधीक्षक यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सहा.पोलीस निरीक्षक सुदाम सिरसाठ व देविदास वाघमोडे यांचेसह पथकाला खात्री करून छापा मारण्याचे निर्देश देऊन रवाना केले.

पो.अ. कार्यालय येथील छापा पथकाला वैजापूर येथून अधिक पोलिसांचे एक पथक देवून पोलिसांची वाढीव कुमक देण्यात आली. यावेळी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून श्रीकृष्णनगर, गंगापूर येथील ज्ञानेश्वर रंगनाथ यादव यांच्या शेताजवळ रात्री 08:00 वाजेच्या सुमारास सापळा लावला. हा परिसर अंदाजे जवळपास 11 एकरचा असून संपूर्ण परिसराला संरक्षण भिंतीसह काटेरी तारेचे फेन्सिंग करण्यात आलेले आहे. या शेतातील प्रवेश करण्यासाठी फक्त एकच गेट असून तो लॉक करून ठेवण्यात आला होता. तसेच गेट जवळील आत जाण्याचा परिसर 100 मीटर पेक्षा अधिक असल्याने याठिकाणी एक व्यक्ती हा येणा-या जाणा-यावर देखरेखी करिता ठेवण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांची कोणतीही हालचाल लक्षात येताच आतील लोकांना सावध करण्याची व्यवस्था याठिकाणी करण्यात आली होती.

सापळा पथकातील पोलिसांनी या संपूर्ण परिसराची बारकाईने व छुप्यापध्दतीने पाहणी व पडताळणी करून छापा मारण्याचे नियोजन केले. यानुसार पोलिस पथकांनी रात्री 09:00 वाजेच्या सुमारास अंधारात मुख्य प्रवेश द्वाराचे गेट व संरक्षण भिंतीवरून उडया मारून शेतात प्रवेश केला. याठिकाणी लावण्यात आलेल्या काटेरी तारेचे फन्सिंगमुळे पोलीसांना आत प्रवेश करतांना तारेचे कट शरिरावर लागुन जखमा झाल्या.

या जखमांचा पोलिसांनी कोणताही विचार न करता अंधारात शेतात धडकले. गेटपासून काही अंतारवर लोखंडी जाळी असलेल्या पत्र्याच्या शेडमधील कांद्याच्या चाळीजवळ पोलिस पथकाने लपत छपत जावून पडताळणी केली. तेथे 15 जण हे पत्यावर पैसे लावून तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना दिसले. खात्री पटताच पोलिसांनी घेराव टाकून छापा टाकला. यातील 04 जण हे अंधाराचा फायदा घेवून बाजुच्या शेता-ताने पळून गेले, तर इतर तिर्रट जुगार खेळणा-या 11 जणांना ताब्यात व विश्वसात घेऊन त्यांचे नाव गाव विचारता ती पुढील प्रमाणे सांगितली.

1) ज्ञानेश्वर रंगनाथ यादव वय 45 वर्षे रा. श्रीकृष्णनगर,गंगापूर 2) शिवाजी नारायण खैरे वय 41 वर्षे रा वळदगाव, पंढरपूर, औरंगाबाद  3) चंद्रकांत भाऊसाहेब गायकवाड वय 35 वर्षे रा. गंगापूर 4) शुभम राधाकृष्ण साळवे वय 21 वर्षे रा.गंगापूर 5) मोहसीनअली अब्बास रजवी वय 33 वर्षे रा. औरंगाबाद 6) शफिक गुलाम रसूल वय 21 वर्षे रा.कन्नड 7) प्रकाश लहूजी खाजेकर वय 34 वर्षे रा.गंगापूर 8) रमेश एकनाथ मोरे वय 40 वर्षे घोडगाव, गंगापूर 9) संतोष नामदेव काळे वय 40 वर्षे रा.गंगापूर 10) हकिम शेख चाँद वय 20 वर्षे रा.गंगापूर 11) दिलीप नामदेव पवार वय 39 वर्षे रा. गंगापूर अशी त्यांची नावे आहेत.

त्यांच्या ताब्यातून 3,36,230/- रुपये रोख तसेच 04 वाहने चारचाकी, 03 दुचाकी, मोबाईल हॅन्डसेट 13, जुगाराचे साहित्य असा एकूण 36,88,930/-  किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीविरुध्द पोलीस ठाणे गंगापूर येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस ठाणे गंगापूर हे करित आहेत.

ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुदाम सिरसाठ, देविदास वाघमोडे,  पो.उप.नि. श्रीराम काळे पोलीस अंमलदार सुनील शिराळे, जावेद शेख, संदिप आव्हाळे, विनोद जोनवाल, कल्याण खेडकर, आत्माराम पैठणकर, दिनेश गायकवाड, अमोल मोरे, योगेश कदम, गोपाल जोनवाल यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!