महाराष्ट्र
Trending

बोकडाचा कार्यक्रम: टेम्पोमधून खाली ओढून श्रीमुखात भडकावली ! दुसऱ्या दिवशी पुन्हा डोक्यात दगड घातला, भोकरदन तालुक्यातील घटना !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २०- बोकडाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी गावातील अनेक जण टेम्पोत बसले. तेवढ्यात एक जण तेथे आला व तू टॅम्पोमध्ये बसू नको तू बोकड्याच्या कार्यक्रमाला येवू नको म्हणून खाली ओढले व श्रीमुखात भडकावली. त्यानंतर पुन्हा दुसर्या दिवशी वाद झाला आणि डोक्यात दगड मारून जखमी केले. ही घटना जालना जिल्ह्यातील गोशेगाव (ता. भोकरदन) येथे घडली.

बबन खेत्रे (वय 24 वर्ष धंदा मजुरी रा. गोषेगाव ता भोकरदन जि जालना) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, गोषेगाव शिवारात शेतात राहतात. बबन खेत्रे यांच्या चुलत भाऊ राजु सुखदेव खेत्रे यांचा बोकड्याचा कार्यक्रम असल्याने बबन खेत्रे व आजी शांताबाई विठ्ठल खेत्रे व वडील बबन विठ्ठल खेत्रे असे कार्यक्रमाला दिनांक 19/06/2023 रोजी रात्री 08:30 वाजता जाण्यासाठी टॅम्पोमध्ये बसले.

तेव्हा सतीष हरीदास खेत्रे हा बबन खेत्रे यांना म्हणाला की, तू टॅम्पोमध्ये बसू नको तू बोकड्याच्या कार्यक्रमाला येवू नको असे म्हणून बबन खेत्रे यांना शिवीगाळ करून टॅम्पो मधून खाली ओढले. त्यानंतर बबन खेत्रे यांच्या तोंडात दोन चापटा मरल्या असता तेथील लोकांनी मध्यस्थी केली होती. त्यानंतर बबन खेत्रे, आजी व वडील रात्री शेतात निघून गेले.

आज दिनांक 20/06/2023 रोजी सकाळी 08:00 वाजेच्या सुमारास बबन खेत्रे हे घरासमोरील गावातील दुकानात साखर आनण्यासाठी जात असताना सतीष हरीदास खेत्रे व त्याचे वडील हरीदास येसुबा खेत्रे हे भेटले. बबन खेत्रे यास म्हणाले की तू म्हणाला की, तू रात्री आमच्या सोबत का वाद घातला, असे म्हणून त्यांनी बबन खेत्रे यांना शिवीगाळ करून चापट बुक्क्यांनी मारहाण केली व सतीष हरादास खेत्रे यांनी तेथे पडलेला दगड हातात घेवून बबन खेत्रे यांच्या डोक्यात मारून डोके फोडून जखमी केले. भांडणाचा आवाज ऐकून दोन महिला या तेथे आल्या व त्यांनी पण शिवीगाळ करुन चापट बुक्क्यांनी मारहाण केली व तू आमच्या विरुध्द तक्रार दिली तर तुला जिवे मारु अशी धमकी दिली. त्यानंतर परिसरातील लोकांनी भांडण सोडवले.

याप्रकरणी बबन खेत्रे (वय 24 वर्ष धंदा मजुरी रा. गोषेगाव ता भोकरदन जि जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सतीष हरीदास खेत्रे, हरीदास येसुबा खेत्रे व दोन महिलांवर हसनाबाद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!