छत्रपती संभाजीनगर
Trending

पत्नी व मुलीचा दोरीने गळा आवळून खून नंतर स्वतः केली आत्महत्या ! छत्रपती संभाजीनगर शहरातील खळबळजनक घटना !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २ – वैवाहिक वादाच्या कारणावरून पत्नी व मुलीचा दोरीने गळा आवळून खून केला व नंतर स्वतः.ही आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील वळदगाव शिवारात हा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. त्याचा उलगडा पोलिसांनी केला आहे.

पत्नी पुजामोहन डांगर (वय 27 वर्षे), श्रेया मोहन झळके (वय 5 वर्षे दोन्ही रा. डांगर वस्ती, वळदगाव शिवार, छत्रपती संभाजीनगर) अशी मृतांची नावे आहेत. मोहन प्रतापसिंग डांगर (रा. डांगर वस्ती, वळदगाव शिवार, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. पत्नी व मुलीचा खून करून यानेही आत्महत्या केली.

काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. नंतर केलेल्या चौकशी मध्ये घटनास्थळ पंचनामा, साक्षीदाराचे जबाब, मरणोत्तर पंचनामा, प्रोव्हिजनल पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट, जप्ती पंचनामा यावरून आरोपी प्रतापसिंग डांगर याचा त्याच्या पत्नीसोबत वाद होता. हे कुटुंब संजय त्र्यंबक झळके यांच्या घरात राहात होते.

दिनांक 18/05/2023 रोजी वेळ 22.00 वाजता ते दिनांक 08.30 वाजेदरम्यान संजय त्र्यंबक झळके यांच्या घरात राहत असलेल्या खोलीमध्ये यातील आरोपी मोहन प्रतापसिंग डांगर यांनी त्यांची पत्नीसोबत असलेल्या वैवाहिक वादाच्या कारणावरून त्यांची पत्नी पूजा मोहन डांगर (वय 27 वर्षे), व मुलगी श्रेया मोहन डांगर (वय 5 वर्षे) या दोघींचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यांना घराच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास दिला व त्याच लोखंडी अँगलला मोहन प्रतापसिंग डांगर यांनी स्वतः साडीने गळफास घेवून आत्महत्या केली.

याप्रकरणी पोलिस उप निरीक्षक वंदना मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरू मोहन प्रतापसिंग डांगर यांचेविरूद्ध कलम 302 भारतीय दंड संहिताप्रमाणे छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!