महाराष्ट्र
Trending

जाफराबादच्या कनिष्ठ अभियंत्यास मारहाण, जल जीवनच्या विहिरीचे काम बंद पाडले ! तुम्ही मराठवाड्याचे, विदर्भात शासकीय काम करू देणार नाही, विहिरीत गाडून टाकण्याची धमकी !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – जलजीवन मिशन अंतर्गत मौजे चापनेर, धोंडखेडा, बेलोरा या गावासाठी मंजूर विहीरीचे काम सुरु असताना चौघांनी काम बंद पाडले. कनिष्ठ अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, जाफराबाद जि.जालना) यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तुम्ही जर धाड पोलिस स्टेशनला तक्रार दिली तर याच विहीरीत तुम्हाला गाडून टाकू अशी धमकीही त्यांनी दिली. याप्रकरणी कनिष्ठ अभियंत्यांनी जाफराबाद पोलिसांत तक्रार दिली असून जाफराबाद पोलिसांनी हे प्रकरण धाड (बुलढाणा) पोलिसांकडे वर्ग केले आहे.

1) सुरेश भगवासिंग धनावत (रा. चांडोळ ता. जि. बुलढाणा) व इतर तीन अनोळखी अशी आरोपींची नावे आहेत. श्रीकांत दामोदरराव वानखेडे (वय 26 वर्षे व्यवसाय नौकारी ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कनिष्ठ अभियंता जाफराबाद जि.जालना) यांनी पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, सन 2022 मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत मौजे चापनेर, धोंडखेडा, बेलोरा या गावासाठी दोन विहिरी केंद्र शासनाकडून मंजुर झालेल्या आहेत. या विहीरीच्या खोदकामासाठी कनिष्ठ अभियंता श्रीकांत वानखेडे, त्यांच्या स्टाफ व गावाच्या सरपंच व इतर बॉडीने मौजे चांडोळ शिवार (ता. जि. बुलढाणा) भाग 1 शेत गट क्रमांक 360 मध्ये अनिल बाबासाहेब देशमुख यांच्याकडुन त्यांची जमीन शासकीय नियमाप्रमाणे नोटरी दानपत्र करुन घेतली असून तसे त्यांचे संमतीपत्र आहे.

दिनांक 19.05.2023 रोजी 11.10 वाजेच्या सुमारास मौजे चांडोळ शिवार (ता.जि. बुलढाणा) भाग शेत गट क्रमांक 360 मधील अनिल बाबासाहेब देशमुख यांच्या शेतात कनिष्ठ अभियंता श्रीकांत वानखेडे व सोबत राजेश मोठेबा म्हस्के (सब कॉंट्रेक्टर), विनोद तानाजी काळे (सब कॉट्रेक्टर), दैवशाला विनोद काळे (सरपंच मौजे चापनेर धोंडखेडा), लक्ष्मीबाई आत्माराम शेळके (सरपंच बेलोरा) आदी विहीरीचे पोकलेन LR ( मशिन ) च्या साह्याने अंदाजे 30 फुट काम पूर्ण केले. खोदकाम करित असताना त्या ठिकाणी 1) सुरेश भगवासिंग धनावत व इतर तीन अनोळखी आले व सुरेश भगवासिंग धनावत (रा. चांडोळ ता. जि. बुलढाणा) यांनी कनिष्ठ अभियंता श्रीकांत वानखेडे यांना व त्यांच्यासोबत असलेल्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

तुम्ही येथे विहीर का खोदतात तुम्ही कोण आहे असे म्हणुन त्यांनी खोदकाम थांबवले. तुम्ही मराठवाड्याचे आहे विदर्भात तुम्हाला कुठलेही शासकीय काम करू देणार नाही असे म्हणून त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. कनिष्ठ अभियंता श्रीकांत वानखेडे यांनी व त्यांच्या सोबतच्या स्टाफने त्यांना खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सुरेश भगवासिंग धनावत (रा. चांडोळ ता. जि. बुलढाणा) यांनी व तीन अनोळखी यांनी कनिष्ठ अभियंता श्रीकांत वानखेडे यांना शिवीगाळ करुन हुज्जत घालून लोट-लाट केली.

लाथा बुक्यांनी मारहाण करून आश्लिल भाषेत शिवीगाळ केली. येथून निघून जा नाहीतर तुम्ही खोदलेल्या विहीरतच तुम्हाला सर्वांना मारून टाकून गाडून टाकू व कुणाला पत्ताही लागू देणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर पोकल्यान LR ( मशिन ) ला दगडे मारून तोड़-फोड करून नुकसान केले. मी कोण आहे तुम्हाला आजून माहित नाही. मुकाट्याने येथून निघून जा अशा धमक्या दिल्या. आता जर आमच्या हाद्दीमध्ये दिसला किंवा पो.स्टे. धाड येथे तक्रार देणेसाठी आला तर जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यामुळे पो.स्टे धाड येथे न जाता पो.स्टे जाफ्राबाद येथे तक्रार तक्रार देण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!