महाराष्ट्र
Trending

जालना महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकाला विनयभंगाच्या गुन्ह्यातून सहीसलामत काढण्यासाठी ५ लाख मागितले ! छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशन परिसरात बोलावून दिली बदनामीची धमकी !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – तुमच्या विरोधात कदीम जालना पोलीस ठाणे येथे विनयभंग व पोक्सो कलमा अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातून सहीसलामत निघायचे असेल तर ५ लाख द्या. नाही दिले तर बदनामी करून या प्रकरणात तुम्हाला आणखी गुंतवू अशी धमकी दिल्याप्रकरणी कदीम जालना पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकनाथ बाळासाहेब कोडग (वय 58 वर्षे, व्यवसाय नोकरी महाराष्ट्र ग्रामीण बँक, गांधी चमन जुना जालना रा-प्लॅट नं-G 103हायबीस सोसायटी कैलास जीवन फॅक्ट्रीजवळ धायरी पुणे, हल्ली मु. निलम नगर जुना जालना) यांनी पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, ते महाराष्ट्र ग्रामीण बँक गांधी चमन जुना जालना येथे शाखा व्यवस्थापक या पदावर मागील एक वर्षापासून कार्यरत आहे. बँकेच्या कार्यक्षेत्रात मोरंडी मोहल्ला, देहकरवाडी तंदुपुरा, कैकाड़ी मोहल्ला, हकीम मोहल्ला असा शहरी भाग असून बावनेपांगरी, दगडवाडी, गुंडेवाडी व रेवगाव असा ग्रामीण भाग येतो. या भागांत बँक मॅनेजर एकनाथ बाळासाहेब कोडग यांना कर्ज वसुलीसाठी जावे लागते.

दि-08/05/2023 रोजी बँक मॅनेजर एकनाथ बाळासाहेब कोडग हे व बँकेमधील कर्मचारी नेहमीप्रमाने बँकेचे कामकाज करीत होते. कॅबीनमध्ये संध्याकाळी 07.30 वाजेच्या सुमारास बँकेचे कामकाज सुरु असताना एक अनोळखी कॅबीनचा दरावाजा ढकलून खुर्चीवर बसला. त्यानंतर तो म्हणाला की, त्याचे नाव कैलास मोघे असे असून तो अंबड पोलीस स्टेशन येथे ड्युटीला आहे. तुमच्या विरोधात कदीम जालना पोलीस ठाणे येथे विनयभंग व पोक्सो कलमा अंतर्गत गुन्हा दाखल आहे असे सांगत त्याने त्यांच्या खिशातून एक कागद काढून बँक मॅनेजर एकनाथ बाळासाहेब कोडग यांच्या टेबलावर ठेवला.

त्या कागदावर पोलीस ठाणे कदीम जालनाचा शिक्का होता व गुन्ह्याचे डिटेल्स होते. सदर गुन्ह्यातील फिर्यादी मुलगी ही छत्रपती संभाजीनगरची असल्याचे नमूद होते तर आरोपीचे नाव एकनाथ कोडक (रा- जालना) असे होते. तेव्हा बँक मॅनेजर एकनाथ बाळासाहेब कोडग हे त्या अनोळखी व्यक्तीला म्हणाले की, तुम्हाला हा पेपर कोठून मिळाला तेव्हा त्याने सांगितले की, मी पोलीस स्टेशन कदीम जालना येथे ऑफिस कामानिमीत्त गेलो होतो तेव्हा मिळाला. मी तुम्हाला ओळखतो तुमच्या विरोधात कोणीतरी तुमच्या जवळच्या माणसाने तुम्हाला खोट्या गुन्हयात अडकविण्यासाठी ही तक्रार दिलेली आहे.

तुम्हाला जर या प्रकरणातून सही सलामत सुटायचे असेल तर मी तुम्हाला एक मोबाईल क्रमांक देतो तुम्ही त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा असे म्हणून त्याने बँक मॅनेजर एकनाथ बाळासाहेब कोडग यांना मोबाईल नंबर सांगितला. थोड्याच वेळात त्या मोबाईल क्रमांकावरुन फोन आला परंतु तो कॉल बँक मॅनेजर एकनाथ बाळासाहेब कोडग यांनी उचलला नाही. त्यानंतर तो कॅबिनमधून निघून गेला. घडलेल्या प्रकरणामुळे बँक मॅनेजर एकनाथ बाळासाहेब कोडग हे घाबरून गेले व स्टॉफला परत बँकेत बोलावून घेतले. त्यांना सर्व हकीकत सांगितली व व ते घरी गेले.

दिनांक 09/05/2023 रोजी बँक मॅनेजर एकनाथ बाळासाहेब कोडग हे त्यांच्या निलम नगर येथील घरी असताना त्यांनी क्षेत्रीय कार्यालायाच्या व्यवस्थापकांनाही सर्व हाकीगत सांगितली. व्यवस्थापकांनी छत्रपती संभाजीनगर येथे बोलावून घेतले. मुख्य कार्यालय गोलवाडी येथे प्रत्यक्ष भेटून घडलेला सविस्तर प्रकार सांगितला. तेव्हा बँकेतील कर्मचार्यांनी त्या व्यक्तीने दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने नाव न सांगता छत्रपती संभाजीनगर रेल्वस्टेशन परिसरात भेटण्यासाठी बोलावले.

तेव्हा बँकेचे दोन कर्मचारी रेल्वेस्टेशन येथे 05.00 वाजेच्या सुमारास गेले. तेथे गेल्यानंतर पुन्हा वरील क्रमावर कॉल केला असता त्या व्यक्तीने पोलीस मदत केंद्र छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशन या ठिकाणी येण्यास सांगितले. त्यानंतर बॅंकेचे दोन्ही कर्मचारी तेथे गेले असता तेथे तिन अनोळखी त्यांना भेटले व म्हणाले की, तुमचे साहेब एकनाथ कोडक यांच्याविरुद्धची तक्रार परत घ्यायची असेल तर त्यांनी पाच लाख रुपये द्यावे नाही दिले तर आम्ही त्यांना या प्रकरणात आणखी गुंतवु व त्यांची समाजात व कुंटुबात बदनामी करू व त्यांना निवृत्ती नंतर कोणताही लाभ मिळु देणार नाही, असे त्यांनी सांगितले.

बँक मॅनेजर एकनाथ बाळासाहेब कोडग यांनी कुठलाही विनयभंगाचा प्रकार केलेला नसल्याने व मुद्दामपणे खोटा गुन्हा दाखल करून बँकेत कैलास मोघे या नावाच्या व्यक्तीने तो पोलीस नसतांना पोलीस असल्याचे बतावणी करून गुन्हा दाखल केला असल्याबाबत कागद दाखवून एक मोबाईल नंबर देऊन तो व्यक्ती तुम्हाला या गुन्ह्यातून सहीसलामत बाहेर काढेल अशी भीती दाखवून व गुन्हा मागे घ्यायचा असल्यास त्याच्या मित्रांना पाच लाख रूपये द्यावे लागतील अशी मागणी केली. नाही दिले तर यात अजून अडकवून टाकण्याची व बदनामी करण्याची धमकी दिली. पोलस अटक करतील या भीतीमुळे बँक मॅनेजर एकनाथ बाळासाहेब कोडग हे चार दिवस बँकेत कामावर गेले नाही.

Back to top button
error: Content is protected !!