महाराष्ट्र
Trending

जालन्यातील व्यापाऱ्याची १४ लाख ७० हजारांची पिशवी चोरट्याने धूम स्टाईल पळवली ! भरदिवसा चोरी झाल्याने व्यापाऱ्यांत दहशत !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २५- व्यापाऱ्याचे १४ लाख ७० हजार रुपये भरदिवसा चोरी केल्याची घटना घडल्याने जालन्यात एकच खळबळ उडाली आहे. स्कुटीवर पुढे ठेवलेली बॅक चोरट्याने धूम स्टाईल पळवली.  सकाळी 11.40 वाजेच्या सुमारास तिरुपती ट्रेडर्स येथून MIDC जालना येथील भाग्यलक्ष्मी रोलींग मील कंपनी येथे जमा करण्यासाठी स्कूटीवर निघालेल्या दोघांना चोरट्यांनी पाठलाग करून ही रक्कम लंपास केली. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास पथकाला चोरट्यांना पकडण्याचे निर्देश दिले.

योगेश राजेंद्र मालोदे (वय 38 वर्षे व्यवसाय खाजगी नौकरी रा. कन्हैयानगर ता जि जालना) हे जालना midc येथील सुनिल बजाज यांचेकडे काम करतात. सुनिल बजाज हे MIDC येथील पोलाद कंपनीमधून लोखंडी स्टीलच्या सळई खरेदी करून ग्राहकांना विक्री करत असतात. लोखंडी स्टिलच्या सळई ज्या ग्राहकांना विक्री केल्या आहे. त्यांना संपर्क करून त्यांचे बिलाचे पैसे देणे बाबत ते सांगत असतात.

त्यानंतर ग्राहक हे सुनील बजाज यांच्या तिरुपती ट्रेडर्स येथे पैसे जमा करतात. तिरुपती ट्रेडर्स येथे जमा झालेले पैसे मालक सुनिल बजाज यांच्या सांगण्याप्रमाणे MIDC जालना येथील भाग्यलक्ष्मी रोलींग मील कंपनी येथे जमा करत असतात. सदर कामकाज पाहण्यासाठी योगेश मालोदे यांच्यासोबत संतोष नळणकर (रा. चंदनझिरा जालना) हे देखील मदतीला असतात. दि. 24.07.2023 रोजी सकाळी 10.40 वा सुमारास योगेश मालोदे नेहमीप्रमाणे तिरुपती ट्रेडर्स MIDC जालना येथे सुनील बजाज यांच्या कार्यालयात आले होते. त्यापूर्वी कार्यालयात संतोष नळणकर हे देखील होते. दोघांनी कार्यालयाचे साफसफाई केल्यानंतर थोड्याच वेळात कार्यालयात मालक सुनील बजाज हे कार्यालयात आले.

साधारणता सकाळी 11.40 वाजेच्या सुमारास मालक सुनिल बजाज यांनी एका कपड्याची पिशवीमध्ये 14,70,000/- (चौदा लाख सत्तर हजार रुपये) दिले व सदर पैसे MIDC जालना येथील भाग्यलक्ष्मी रोलींग मील कंपनीत देऊन या असे सांगितले होते. तसेच मालकाने संतोष नळणकर यांना सोबत घेवून जाण्याबाबत सांगितले होते. त्यानंतर मालकाने दिलेले पैसे घेवून योगेश मालोदे व सोबत संतोष नऴणकर सकाळी 11.40 वाजेच्या सुमारास तिरुपती ट्रेडर्स येथून MIDC जालना येथील भाग्यलक्ष्मी रोलींग मील कंपनी येथे जमा करण्यासाठी अॅक्टीव्हा स्कूटीवर निघाले. सदर स्कूटी योगेश मालोदे चालवत होते व पाठीमागे संतोष नळणकर हे बसलेले होते.

पैश्याची भरलेली पिशवी योगेश मालोदे यांच्या पायाजवळ समोर स्कूटीवर ठेवलेली होती. योगेश मालोदे व संतोष नळणकर कार्यालयातून अर्धा किलोमीटर पूढे ओमसाईराम कंपनीसमोरील गेटजवळ गेले असता त्यांच्या पाठीमागून एका होंडा शाईन कंपनीच्या विना नंबर मोटरसायकलवर दोन अनोळखी आले व पाठीमागे बसलेल्या चोरट्याने योगेश मालोदे यांच्या पायासमोर स्कूटीवर ठेवलेली पांढऱ्या रंगाची पिशवी बळजबरीने हिसकावून घेवून पळून गेले. सदर चोरट्यांनी तोंडाला रुमाल गुंडाळलेला होता.

Back to top button
error: Content is protected !!