कन्नडछत्रपती संभाजीनगर
Trending

कन्नड तालुक्यातील नागदला राज्य उत्पादन शुल्क विभागाची छापेमारी, बनावट दारू तयार करणारा जेरबंद !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनिय बातमीवरून कन्नड तालुक्यातील नागद येथे छापा मारण्यात आला. बनावट दारू तयार करणा-या आरोपीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. . सदर कारवाईत रु. १,२४,०७०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. योगेश हरी चौधरी (रा. आझाद चौक पारोळा, जि. जळगांव ह.मु. गट नं. ०८, प्लॉट नं. ११५, नागद, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

दिनांक १४/१०/२०२३ रोजी गुप्त बातमीच्या अनुषंगाने गट नं. ०८, प्लॉट नं. ११५, नागद, ता. कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे छापा मारला असता त्या ठिकाणी योगेश हरी चौधरी (रा. आझाद चौक पारोळा, जि. जळगांव ह.मु. गट नं. ०८, प्लॉट नं. ११५, नागद, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) हा प्रथमदर्शनी बनावट दारू तयार करत होता. रॉयल स्टॅग व्हिस्की १८० मि.ली. क्षमतेच्या एकूण ३० सिलबंद दारु बाटल्या, प्रथमदर्शनी बनावट ऑफीसर चॉईस ब्ल्यू व्हिस्की १८० मि.ली. क्षमतेच्या एकूण २० सिलबंद बाटल्या मिळून आल्या.

भारतीय बनावटीची विदेशी मद्य तयार करण्याकरिता लागणारे ३५ लि. क्षमतेची पांढऱ्या रंगाच्या एक प्लास्टीक कॅनमध्ये अंदाजे १५ लिटर स्पिरीट (इ.एन.ए.) द्रव्य, ३५ लि. क्षमतेची पिवळया रंगाच्या एका प्लास्टीक कॅनमध्ये अंदाजे २० लिटर तयार मद्यार्क (ब्लेण्ड) द्रव्य, दारु बाटल्यावर बुच सिलबंद करण्यासाठी लागणारे यंत्र (बॉटलींग मशीन), रॉयल स्टॅग व्हिस्की १८० मि.ली. क्षमतेच्या एकूण ६० रिकाम्या दारु बाटल्या, ऑफीसर चॉईस ब्ल्यु व्हिस्की १८० मि.ली. क्षमतेच्या एकूण ५० रिकाम्या दारु बाटल्या मिळून आल्या.

हिरो कंपनीची पांढऱ्या रंगांची प्लेझर दुचाकी वाहन क्रमांक MH-१९-BY- ९९८०, जिओ कंपनीचा मोबाईल, ऑफीसर चॉईस ब्ल्यु व्हिस्कीचे १० जिवंत बुचे इत्यादी द्रव्ये व इतर साहित्य वापरून त्यापासून बनावटरित्या विदेशी मद्य तयार करून सदरील मद्य रॉयल स्टॅग व्हिस्की १८० मि.ली. क्षमतेच्या व ऑफीसर चॉईस ब्ल्यु व्हिस्की १८० मि.ली. क्षमतेच्या रिकाम्या काचेच्या बाटल्यात भरुन सदर बाटल्या त्याकडे असलेल्या जिवंत बुचाने बंद करून बनावट दारुसाठा तयार करून विक्रीच्या उद्देशाने साठवून, बाळगून असतांना मिळून आला आहे. सदर कारवाईत रु. १,२४,०७०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी योगेश हरी चौधरी याच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क के विभागाचे निरीक्षक एन.एस. डहाके, दुय्यम निरीक्षक एस.डी. घुले, एस.एस. पाटील, तसेच महीला दुय्यम निरीक्षक पी. आर. हुबांड, ए.बी.म्हस्के, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आर.एम. भारती, आर. के. आंभोरे, जवान एम. एच. बहुरे, बी.सी. किरवले, एस.एस. खरात, ए.पी नवगीरे, यांनी केली. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस.डी.घुले करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!