खुलताबादछत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

खुलताबाद तालुक्यात शेती खरेदी विक्री दलालांचा सुळसुळाट ! खांडी पिंपळगाव येथील शेतीची इसारपावती करून १७ लाखांची फसवणूक !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – खुलताबाद तालुक्यात शेतीच्या एजंटचा सुळसुळाट झाला असून खांडी पिंपळगाव येथील शेतीची इसारपावती करून 17.76,000/- रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1) अजिनाथ दादाराव उबाळे, 2) वैजीनाथ दादाराव उबाळे, 3) एकनाथ दादाराव उबाळे, 4) दादाराव बाळासाहेब उबाळे, 5) सविता अजिनाथ उबाळे, सर्व रा. मौजे खांडी पिंपळगाव, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर, 6) सतिष पंडित पाटील, रा. बजाजनगर, मोरे चौक, वाळूज, छत्रपती संभाजीनगर अशी आरोपींची नावे आहेत.

यातील आरोपीतांनी संगनमत करून फिर्यादी यांना दिनांक 25/08/2023 व दिनांक 31/08/2023 रोजी खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील जमीन मालक अजिनाथ उबाळे, वैजीनाथ दादाराव उबाळे, एकनाथ दादाराव उबाळे व त्यांची पत्नी सविता अजिनाथ उबाळे यांची मौजे खांडी पिंपळगाव येथील शेत गट नं. 210 मधील 06 एकर 18 गुंठे व 1 हेक्टर 13 गुंठे जमीन ही 19,00,000 (एकोणावीस लाख) रूपये एकर प्रमाणे दलाल सतिष पंडित पाटील याचे जमीन दाखविले वरून व सांगण्यावरून 100 रुपयांच्या बाँडवर त्यांना जमीनीचे इसार पोटी 17,76,000 (सतरा लाख शह्यात्तर हजार) रूपये रोख देवून इसार पावती करून घेतली होती.

खरेदीखत दिनांक 25/12/2023 रोजी करण्याचे ठरविले होते. परंतु आज पावेतो वरील जमीन मालक व दलाल यांनी आज पावेतो सदर जमीनीची मोजणी व खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ करून त्यांना इसारापोटी दिलेली रोख रक्कम 17,76,000 (सतरा लाख शह्यात्तर हजार) रूपये परत न देता व जमीनीची मोजणी करून खरेदीखत करून न देता फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला व विश्वासघात करून फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यासंदर्भात श्रेयांश अजय ओसवाल (रा. सुमंगल पार्क संत एकनाथ रंग मंदिराजवळ उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांवर उस्मानपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि चौरे करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!