महाराष्ट्र
Trending

घनसावंगी तालुक्यात क्षुल्लक कारणावरून चाकू हल्ला ! घरासमोर मोबाईलवर शिवीगाळ करू नको असे म्हणाल्याने राग आला अन् !!

तू तुझ काम कर नसता माझ्या नादाला लागला तर तुला फाडून टाकील, असे धमकावल्याची तक्रार

संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – क्षुल्लक कारणावरून चाकु व गजाने मारहाण केल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील गोंदी पोलिस स्टेशन हद्दीत घडली. यात एक जण जखमी झाला. घरासमोर मोबाईलवर शिवीगाळ करू नको असे सांगितल्याने राग येऊन त्याने नंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन हा हल्ला चढवल्याची प्राथमिक माहिती आहे.

गजानन बाबुराव साबळे (वय 28 वर्षे, रा. वडिरामसगाव ता. घनसावंगी जि. जालना) असे जखमीचे नाव आहे. गजानन साबळे यांच्यावर कलावती हॉस्पिटल येथे उपचार सुरु असून त्यांनी पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, दि. 24/04/2023 रोजी सायंकाळी 7.00 वाजेच्या सुमारास ते व त्यांची आई, भाऊ घरी असतांना गावातील सूर्यजीत वसंत पवार हा घरासमोर त्याच्या मोबाईलवर कोणाला तरी शिव्या देत होता. तेव्हा गजानन साबळे त्याला म्हणाले की तू बाजुला जा आमच्या घरासमोर शिव्या देऊ नको.

आमच्या घरी महिला आहे तू येथून निघून जा. तेव्हा सूर्यजीत याला गजानन साबळे यांच्या बोलण्याचा राग आला. व तो शिव्या देवून म्हणाला की तू तुझ काम कर नसता माझ्या नादाला लागला तर तुला फाडुन टाकील. असे म्हणून त्याने गजानन साबळे यांना ढकलून दिले. तेव्हा दोघांमध्ये हाता पायी होवून शिवीगाळ झाली. त्यानंतर सूर्यजीत घरी निघून गेला व गजानन साबळे हे घरात गेले.

त्यानंतर थोड्या वेळाने, सूर्यजीत वसंत पवार हा त्याचा भाऊ कुणाल वसंत पवार, वडिल वसंत पवार, आईसह गजानन साबळे यांच्या घरात घुसले व त्यांनी शिवीगाळ करून तू मला शिव्या दिल्याच कश्या असे म्हणून सूर्यजीत याने त्याच्या हातातील चाकुने गजानन साबळे यांच्या डोक्यात जबर दुखापत केली.

त्याने दुसरा वार करत असताना गजानन साबळे यांनी हाताने तो अडवला असता उजव्या हाताच्या अंगठ्याला जबर दुखापत झाली. सूर्यजीत याचा भाऊ याने हातातील गजाने मांडीवर मारले गजानन साबळे यांचा भाऊ हा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्याला गजाने व काठीने पाठीवर, मांडीवर मारले. भांडणाचा आवाजाने शेजारी जमा झाले. त्यांनी सोडवा-सोडव केली.

याप्रकरणी गजानन साबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सूर्यजीत वसंत पवारसह त्याच्या कुटुंबातील एकूण चौघांवर गोंदी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!