महाराष्ट्र
Trending

BJP लातूरमध्ये चालू देणार नाही, 25 हजार हप्ता दे, नाहीतर गोळ्या घालतो ! भाजपा किसान मोर्चाच्या उपाध्यक्षाला धमकावले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ९ – तू चालवीत असलेली BJPची संघटना मी लातूरमध्ये चालू देणार नाही. तू जर मला महिना 25,000/-रुपये हप्ता दिला नाही तर तुला दिवसा गोळ्या घालतो, अशी धमकी दिल्याची तक्रार भाजपा किसान मोर्चाचे उपाध्यक्ष यांनी लातूरमधील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे.

या तक्रारीवरून  गोविंद घोडके, इब्राहीम उर्फ बबलू युसुफ खान शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप दादाराव पाटील खंडापुरकर (वय 68वर्षे, धंदा- सामाजिक कार्यकर्ता, रा. खोरे गल्ली लातूर) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, ते राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती, तसेच महाराष्ट्र प्रदेश उपअध्यक्ष भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा तसेच विविध संघटनेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रदीप दादाराव पाटील खंडापुरकर काम करतात.

प्रदीप दादाराव पाटील खंडापुरकर हे दि. 05/02/2023 रोजी रात्री 8.00 वाजेच्या सुमारास नाना-नानी पार्क लातूर येथे पायी वाकिंग करत असताना त्यांच्या मोबाईलवर एक अनोळखी मोबाईल नंबरवरून गोविंद घोडके (रा. लातूर) बोलत आहे असे सांगून तुझी संघटना माझा काका राजु चौगुले यांनी का सोडली कारण तू त्यांना महिनेवारी हप्ता देत नाहीस. तू मला तुझ्या संघटनेचे पद का दिले नाही. तुला मी सोडणार नाही. तू चालवीत असलेली BJPची संघटना मी लातूरमध्ये चालू देणार नाही.

तू जर मला महिना 25,000/- हजार हप्ता दिला नाहीत तर तुला दिवसा गोळ्या घालतो. असे म्हणू लागला. त्यावरून प्रदीप दादाराव पाटील खंडापुरकर यांनी त्याला तू कोण आहेस तुला मी ओळखतही नाही असे म्हणाले. पण त्याने त्यावर न थांबता पुन्हा म्हणाला की, मी तुला व तुझ्या परिवाराला सोडणार नाही. तुला माहित नाही मी राजू चौगुले व राम चामेचा माणूस आहे. मला जर तू महिन्याला 300000 रुपये दिले नाहीस तर तुला व तुझ्या परीवारास गोळ्या घालून खल्लास करून टाकतो, अशी धमकी दिली.

तसचे दि. 06/02/2023 रोजी दुपारी पुन्हा मोबाईलवरुन मी गोविंद घोडके (रा. लातूर) बोलत आहे असे सांगून मी व इब्राहीम उर्फ बबलु युसुफ खान उर्फ शेख असे दोघेजण पुण्याच्या येरवाडा जेलमध्ये एकत्र शिक्षा भोगत असताना त्याने मला सांगितले आहे की, तुला जर पैशाची गरज पडली तर तू प्रदीप दादाराव पाटील खंडापुरकर यांना फोन करून खंडणी माग. जर त्याने खंडणी देण्यास नकार दिला तर त्याला गोळ्या घालून टाक बाकीचे माझ्यावर सोड, असे सांगितले.

तुझ्या कडून खंडणी वसुल करण्याचे तसेच तू जर खंडणी दिली नाहीस तर तुला गोळ्या घालण्याचे काम मला इब्राहीम उर्फ बबलु युसुफ खान उर्फ शेख याने माइयाकडे दिले आहे. असे म्हणुन शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. दि.07/02/2023 रोजी तसेच दि. 08/02/2023 रोजी 14.00 वाजेपर्यंत वेळोवेळी मोबाइलवर गोविंद घोडकेने फोन करुन महिना 300000/- रुपये खंडणी दे नाहीतर मी तर तुला गोळ्या घालणारच आहे. पण इब्राहीम उर्फ बबलु युसुफ खान उर्फ शेख हा सुध्दा तुला व तुझ्या परिवाराला गोळ्या घातल्याशिवाय राहणार नाही असे म्हणून धमकावले.

याप्रकरणी प्रदीप दादाराव पाटील खंडापुरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोविंद घोडके, इब्राहीम उर्फ बबलू युसुफ खान शेख यांच्यावर शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!