टॉप न्यूजमहाराष्ट्र
Trending

लाईनमन व त्याचा पंटर लाचेच्या जाळ्यात ! जुने मीटर काढून नवीन मीटर बसून देण्यासाठी हॉटेलमध्ये पंटर 15 हजार घेताना पकडला !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ – लाईनमन व त्याचा पंटर लाचेच्या जाळ्यात अडकले. जुने मीटर काढून नवीन मीटर बसून देण्यासाठी पंटर 15 हजार घेताना रंगेहात पकडला. हॉटेल आयुब मिस्त्री, मंजिरी फाटा, पाली, जिल्हा बीड येथे हा सापळा लावून कारवाई केली.

1 श्रीमंत जीवराज मुंडे व्यवसाय लाईनमन वर्ग-3 रा . श्रेया निवास , साई सदन कॅालनी , शिंदे नगर ,फेज २ , कॅनल रोड ,बीड 2 ) सय्यद आयुब मोहम्मद वय 42 वर्ष व्यवसाय – हॉटेल चालक ,हॉटेल आयुब मिस्त्री ,राहणार मांडव जाळी तालुका बीड जिल्हा बीड अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार यांचे मंजिरी फाटा पाली येथे व्यावसायिक शटर असून तेथील मीटर जळाल्याने तक्रारदार याने नवीन मीटर बसून देण्यासाठी अर्ज केला होता तसेच नवीन मीटर विकतही घेतले होते. जुने मीटर काढून नवीन मीटर बसून देण्यासाठी तसेच वीज चोरीचा अतिरिक्त दंड न लावण्यासाठी आरोपी लोकसेवक मुंडे यांनी 20000 हजाराची मागणी करून तडजोडीअंती 15000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले व खाजगी व्यक्ती अयुब यांचेकडे लाचेची रक्कम देण्यास सांगितले.

आरोपी लोकसेवक मुंडे यांच्या सांगण्यावरुन आरोपी खाजगी व्यक्ती अयुब याने मंजरी फाटा , पाली , जि बीड येथील अयुब यांच्या हॉटेलमधे लाच रक्कम 15000 रुपये स्वीकारताच त्यास लाच रकमेसह रंगेहात पकडले. खाजगी व्यक्ती अयुब यास ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन बीड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर, मुकुंद आघाव अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – गुलाब बाचेवाड पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि .बीड, पर्यवेक्षण अधिकारी व सह सापळा अधिकारी – शंकर शिंदे, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि.बीड, सापळा पथक – सुरेश सांगळे, अमोल खरसाडे, संतोष राठोड, श्रीराम गिराम , गणेश मेहेत्रे, सुदर्शन निकाळजे ला. प्र. वि.बीड यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!