महाराष्ट्र
Trending

महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला प्रदर्शनीय क्रिकेट सामना !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८: महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच जळगावात मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेदरम्यान महावितरणचे सांघिक कार्यालय तसेच कोकण प्रादे‍शिक कार्यक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संघांत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला प्रदर्शनीय क्रिकेट सामना बरोबरीत सुटला.

अनुभूती प्रशालेच्या मैदानावर झालेल्या या मैत्रीपूर्ण सामन्यात सांघिक कार्यालयाचे नेतृत्व संचालक (प्रकल्प तथा मानव संसाधन) प्रसाद रेशमे यांनी तर कोकण प्रादे‍शिक संघाचे नेतृत्व सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी केले. कोकण संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर ‍नितीन आव्हाड (व्यवस्थापक- वित्त व लेखा) यांच्या शानदार अर्धशतकाच्या (23 चेंडूत नाबाद 53 धावा) जोरावर कोकण संघाने निर्धारित 12 षटकांत 3 बाद 113 धावा केल्या.

आव्हाड यांना मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी 7, कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांनी 10, सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी 4, व्यवस्थापक (वित्त व लेखा) योगेश अमृतकर यांनी 10, जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांनी 8, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात यांनी 2 व अधीक्षक अभियंता इब्राहिम मुलाणी यांनी 7 धावा काढून धावसंख्या वाढवण्यास मदत केली. 12 धावा अतिरिक्त निघाल्या. सांघिक कार्यालयातर्फे संचालक (प्रकल्प तथा मानव संसाधन) प्रसाद रेशमे यांनी 2 षटकांत 15 धावा देऊन 1 गडी बाद केला तर मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी 2 षटकांत 14 धावा देत 2 गडी बाद केले.

प्रत्युत्तरात सांघिक कार्यालयाने सलामीवीर प्रसाद महातोळे (कार्यकारी अभियंता) यांच्या नाबाद 46 धावांच्या जोरावर विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सांघिक कार्यालयास शेवटच्या षटकांत 13 धावांची गरज होती. पहिल्या 5 चेंडूत 1‍0 धावा निघाल्या. शेवटच्या चेंडूवर 3 धावांचे लक्ष्य असताना 2 धावा निघाल्याने रोमहर्षक अवस्थेत अखेर सामना बरोबरीत सुटला.

सांघिक कार्यालयाच्या वतीने महाव्यवस्थापक (मानव संसाधन) राजेंद्र पांडे यांनी 18, संचालक (प्रकल्प तथा मानव संसाधन) प्रसाद रेशमे यांनी 7, कार्यकारी अभियंता चेतन वाडे यांनी 14, मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी 10, कार्यकारी अभियंता धीरज चव्हाण यांनी 8 तर प्रणाली विश्लेषक विक्रांत इंगळे यांनी 2 धावा काढल्या. कोकण संघातर्फे व्यवस्थापक (वित्त व लेखा) योगेश अमृतकर यांनी 3 षटकांत 23 धावा देत 2 गडी बाद केले तर उपमुख्य औद्योगिक संबंध ‍अधिकारी रामगोपाल अहिर यांनी 2 षटकांत 15 धावा देत 1 गडी बाद केला.

सांघिक कार्यालयाच्या वतीने कार्यकारी संचालक (वि‍तरण तथा मानव संसाधन‍) अरविंद भादीकर, मुख्य अभियंता प्रवीणकुमार परदेशी, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट, अधीक्षक अभियंता स्वप्नील काटकर, प्रणाली विश्लेषक संतोष डोंबाळे, उपविधी अधिकारी सुमेध कोलते, कार्यकारी अभियंता योगेश वारके, कार्यकारी अभियंता नीलेश सोनगिरे व कार्यकारी अभियंता ओम भेंडे यांनीही सामन्यात सहभाग घेतला. तर कोकण प्रादे‍शिक संघातर्फे मुख्य अभियंता सुनील काकडे, मुख्य महाव्यवस्थापक (प्रशिक्षण व सुरक्षा) देवेंद्र सायनेकर, उपमुख्य औद्योगिक संबंध ‍अधिकारी प्रमोद राजेभोसले, अप्पासाहेब पाटील, कार्यकारी अभियंता अनिल थोरात, विशाल ‍शिवतरे, रामचंद्र चव्हाण, धनराज बिक्कड, कैलास लव्हेकर, अनिल महाजन, धनंजय आहेर, व्यवस्थापक (मानव संसाधन) योगेश्वर पाडवी यांनी सामन्यात सहभाग नोंदवला.

हा सामना पाहण्यासाठी औरंगाबाद प्रादे‍शिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, जळगाव ‍ परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड, अधीक्षक अभियंता राजेंद्र मार्के यांच्यासह महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तसेच जळगावचे  क्रिकेटप्रेमी ‍नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनुभूती शाळेचे क्रीडा संचालक अरविंद देशपांडे यांनी सामना संयोजनासाठी सहकार्य केले.

Back to top button
error: Content is protected !!