महाराष्ट्र
Trending

जालन्यातील अंबड चौफुलीवरील २००० आंदोलकांवर गुन्हे दाखल ! अश्रुधुराच्या नळकांड्या, लाठीचार्ज अन् हवेत गोळीबार करून जमावावर निरयंत्रण !!

राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावरून पोलिस आंदोलकांवर वेगवेगळ्या कलमांतर्गत नाहक गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३- मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे सुरु असलेल्य उपोषणाच्या मंडपात घुसून आंदोलकांवर जुलमी लाठीचार्ज करणार्या पोलिसांच्या व राज्य सरकारच्या निषेधार्त संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद पहायाला मिळत आहे. दरम्यान, जालन्यातील अंबड चौफुलीवर आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. जमावाला नियंत्रणात आणन्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सौम्य लाठीचार्ज केला याशिवाय हवेत गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांनी तब्बत २००० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणात राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावरून पोलिस आंदोलकांवर वेगवेगळ्या कलमांतर्गत नाहक गुन्हे दाखल करून गोवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पोकॉ सुनील शिवलाल गांगे (पोलिस स्टेशन तालुका जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक 02.09.2023 रोजी मराठा समाजाच्या वतीने प्रलंबित प्रश्नासाठी व मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी अंबड चौफुली जालना येथे रस्ता रोको आंदोलन ठेवण्यात आल होते. सदर आंदोलनाला सकाळी 10.30 वाजता सुरुवात झाली. त्यामध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजक अरविंद देशमुख अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष जालना, अशोक पडुळ, विश्वरभर भानुदास तिरुखे मराठा समन्वयक, देवकर्ण वाघ, राधाकिसन शिंदे संदिप लांडगे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु झाले. सदर आंदोलनामध्ये 1500 ते 2000 जनसमुदाय होता. सदर रस्ता रोको आंदोलन बंदोबस्ताच्या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. सदर वेळी तालुका दंडाधिकारी (तहसिलदार मॅडम) हजर होते.

रास्ता रोको आंदोलन चालु असतांना 11.30 वाजेच्या सुमारास आंदोलनातील जमाव घोषणा देत होते. पोलिस त्यांना शांतता राखण्याचे व शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन करत होते. जमावाने गाड्या अडविण्यासाठी रस्तावर ठिक ठिकाणी मोठ मोठे दगड तसेच लाकडे आडवे टाकून तसेच टायर व लाकडे जाळून निषेध व्यक्त केला. रस्तयावरील वाहने आडवून वाहनाची पेट्रोल व डिझेल टाकून जाळ पोळ करून वाहनावर दगडफेक करून सार्वजनिक तसेच खाजगी मालमत्तेचे नुकसान केले. जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यात पोलीस अधिकारी व अंमलदार जखमी झाले. जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना सुरुवातीला अश्रुधुराचा वापर करावा लागला. जमाव नियंत्रणात येत नसल्याने सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यानंतरही पोलिसांनी 12 बोअर रायफल मधून हवेत गोळीबार केला.

या आंदोलकांवर झाले गुन्हे दाखल- याप्रकरणी पोकॉ सुनील शिवलाल गांगे (पोलिस स्टेशन तालुका जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २००० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1) अरविद देशमुख अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष जालना, 2) अशोक पडुळ 3 ) विश्वरभर भानुदास तिरुखे मराठा समन्वयक रा. दरेगांव. 4) देवकर्ण वाघ 5) राधाकिसन शिंदे 6) संदिप लांडगे यांनी प्रेरणा देवून जमावास भडकल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.  तसेच 7 ) रामदास भानुदास मुळे रा. म्हाडा कॉलणी जालना 8) विष्णु पाचफुले रा. नाव्हा, 9 ) कृष्णा पडुळ रा. आंतरवाला 10) कैलास देठे रा. खरपुडी,

11)प्रशांत वाढेकर रा. जामवाडी, 12) गजानन तौर रा. गोकुळधाम जालना, 13) माऊली मेगडे रा. जालना 14 ) शाम सिरसाट रा. इंदेवाडी, 15 ) दशरत शिंदे रा. इंदेवाडी, 16) राहुल गवारे रा. कुंभेफळ 17 ) रवि ढगे रा. सिरसवाडी 18) गणेश ज्ञानेश्वर ननवरे. रा. देवपिंपळगांव, 19 ) मंगेश गंगाधर ननवरे रा. देवपिंपळगांव 20 ) शुभम विष्णु गाडखेडे रा. देवपिंपळगांव 21 ) डॅनिअल जगन लालझरे रा. म्हडा कॉलणी जालना 22 ) प्रेम अतीश लालझरे रा. म्हडा कॉलणी जालना 23 ) कृष्णा चंपालाल शिंदे रा. गिरोली ता. देऊळगांवराजा जि. बुलढाणा 24) गणेश प्रकाश कचरे रा. नुतन वसाहत जालना 25) समाधान विश्वनाथ गोल्डे रा. रेवगांव

26 ) विकास धोडुभाऊ गव्हाणे रा. सिंधीकाळेगांव 27 ) आदित्य आनंद लोखंडे रा. भवानी नगर जालना28) महेश नागेश जाधव रा. सिद्धार्थ नगर जालना २९ ) संदिप दत्ता शिंदे रा. नूतन वसाहत जालना 30 ) गणेश लिंबांजी भोसले रा. काजळा ३१) महेश महादेव गायकवाड रा. चौधरीनगर जालना ३२) कृष्णा सोमीनाथ मागडे रा. बुठेगांव, 33) परमेश्वर भाऊसाहेब शिंगारे रा. भवानीनगर जालना (३४) प्रमोद संजय खापरे रा. घोंगडे हादगांव 3५) राम दिनकर म्हस्के रा. घोगडे हादगांव ३६ ) संभाजी दादाराव नरके रा. देवपिंपळगांव

3७) ललीत रामेश्वर शिंदे रा. संजयनगर जालना 3८) सुभाष आसाराम लहाणे ३९) गणेश मारुती पळशे रा मोतीबाग जालना ४०) हरिओम बालाजी जाधव रा. माऊलीनगर जालना (४१) मंगेश अण्णासाहेब भोसले रा. माऊली नगर जालना 42 ) आकाश बंडु पांढरे का. काजळा 43 ) प्रसाद राजेश बोरोसे रा.शंकरनगर जालना ४४) भरत साहेबराव गजर रा. गुंडेवाडी ४५ ) प्रभु लक्ष्मण कदम रा. धानोरा, ४६) मधुकर लक्ष्मण पडुळ रा. काजळा ४७) उदध्व कल्याणराव घनघाव रा. डोंगरगांव

४८ ) किशोर संपतराव मदन रा. केळीगव्हाण ४९ ) रमेश त्रिबंकराव शिंदे रा. इंदेवाडी ५०) रोहीत नारायण भोसले रा. शंकरनगर ५१) रामदास भानुदास मगर रा. म्हाडा कॉलणी व ईतर 1500 ते 2000 यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 353,332,336,337,341, 435, 143, 144, 145, 146147, 148149,109, 114, भादवी सह कलम 135 मु.पो. कायदा सहकलम 3 व 4 सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा, सहकलम -7 क्रिमिनल लॉ अमेन्टमेन्ट अॅक्ट प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!