फुलंब्री तालुक्यातील सरपंच मंगेश साबळेंचा पुन्हा इशारा, जरांगे पाटलांचे बरे वाईट झाल्यास मराठा समाज दिल्लीचेही तख्त हलवण्याची ताकद ठेवतो ! लवकर मार्ग काढला नाही तर अंनत्याग करणार !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ८- मनोज जरांगे पाटलांचे काही बरे वाईट झाल्यास मराठा समाज दिल्लीचेही तख्त हलवण्याची ताकद ठेवतो, हे विसरू नये. मराठा आरक्षणावर लवकर मार्ग काढला नाही तर अंनत्याग करण्याचा इशारा फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी दिला आहे. जरांगे पाटलांच्या विनंतीला मान देउन आम्ही शांत आहोत, असेही सरपंच म्हणाले.
अनोखे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी फुलंब्री तालुक्यातील गेवराई तालुक्याचे सरपंच मंगेश साबळे सध्या चर्चेत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल राज्य व देशपातळीवरील प्रसारमाध्यमांत घेतली. मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमीका स्पष्ट करताना सरपंच मंगेश साबळे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने मनोज जरांगे पाटील यांचा अंत पाहू नये. ग्रहमंत्र्यांनी माफी मागून विषय संपवण्याचं स्वप्न पाहू नये. जरांगे पाटील हाडाचे कार्यकर्ते असून त्यांना काही बरे वाईट झाल्यास मराठा समाज दिल्लीचेही तख्त हलवण्याची टाकत ठेवतो हे विसरू नये. मराठ्यानो मराठा आरक्षणाला विरोध म्हणून राजकीय षडयंत्र सुरु झालेले आहे. जरांगे पाटलांच्या विनंतीला मान देवून आम्ही शांत आहोत. सरकारने लवकर मार्ग काढला नाही तर अंनत्याग करून उपोषणाला बसून हा संघर्ष आपल्याला चालू ठेवावा लागेल. आता नाही मिळाल तर कधीच नाही मिळणार. लक्षात ठेवा. जरांगे पाटलानी सांगितल्याप्रमाणे अजून दोन दिवस वाट बघू., असेही सरपंच मंगेश साबळे म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे मनोज जरांगे पाटलांचे उपोषण चालू आहे. या उपोषणाचा वणवा संपूर्ण महाराष्ट्रात पेटला असून सरकारने मराठा समाजाची दिशाभूल करून काढलेल्या जीआरचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध होत आहे. दरम्यान, मराठ्यांना सरसकट आरक्षणाच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम असल्याने सरकारकारला घाम फुटला आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनीही अन्नत्याग करून उपोषणाचा इशारा दिला आहे.
फुलंब्री तालुक्यातील पाल फाट्यावर गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळेंनी स्वत:ची कार पेटवून मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा काल केला होता निषेध – विहिर अनुदान घोटाळ्याचा पर्दाफाश करून पंचायत समिती कार्यालयासमोर नोटांची उधळन करून वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलेले फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी काल, ३ सप्टेंबर रोजी वेगळे आंदोलन करून सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधले होते. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान न करता त्यांनी स्वतहाच्याच कारला इंधन ओतून पेटवून दिले. याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आजही त्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलना टरबूज फोडून प्रतिकात्मक तिरडी आंदोलन काढण्यात आले. दरम्यान, आता त्यांनी या आरक्षणाच्या लढाईला आर पारचे स्वरूप दिले असून राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. यापुढे जावून अन्नत्याग आंदोलनाचा अल्टिमेटमही त्यांनी सरकारला दिला आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe