जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्राचार्यांची बैठक ! नविन शैक्षणिक धोरणसंदर्भात चर्चा !!
छत्रपती संभाजीनगर, दि.१९ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्हयातील प्राचार्यांची बैठक मंगळवारी दि.२० आयोजित करण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक सत्र तसेच नवीन शैक्षणिक धोरण या अनुषंगाने बैठकीत चर्चा होणार आहे.
कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ नाटयगृहात मंगळवारी दुपारी ३ वाजता ही बैठक होईल. शैक्षणिक सन २०२३-२४ हे १५ जूनपासून सुरु झाले आहे. तसेच ’नविन शैक्षणिक धोरण-२०२०’ ची प्रभावी अंमलबजावणी पुढील वर्षांपासुन पदवी स्तरावर होणार आहे.
या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा होईल. यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ.प्रशांत अमृतकर, परीक्षा मंडळ संचालक डॉ. भारती गवळी आदींची यांची प्रमुख उपस्थिती राहील. बैठकीस जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयांच्या सर्व प्राचार्यांही उपस्थित राहावे, असे शैक्षणिक विभागाचे कुलसचिव डॉ. संजय कवडे यांनी कळवले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe