छत्रपती संभाजीनगरपैठण
Trending

पैठण तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी, पोलिस अधीक्षकांना अहवाल सादर करण्याचे निर्देश !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. सद्यस्थितीत भा.द.वि ३७६ आणि पॉक्सो, अट्रोसिटी या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपी अटकेत आहेत. पीडित मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयोगाने स्वाधिकारे दखल घेत छत्रपती संभाजी नगरचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांना तातडीने कार्यवाही करून आयोगास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. दरम्यान, आयोगाच्या सदस्य सचिव यांनी तसे लेखी आदेशही पोलिसांना पाठवले आहेत.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव मायादेवी पाटोळे यांनी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा पोलिस अधिक्षकांना आदेश पाठवले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात तेलवाडी गावात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी पाशवी अत्याचारासंदर्भात सदरील आदेश दिले आहेत.

सदरील आदेशात नमूद केले आहे की, महाराष्ट्र राज्य महिला आयोगकार्यालय अधिनियम, १९९३ अंतर्गत कलम १०(१) (फ) (एक) व (२) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्वीकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेणे याकरीता महिला आयोग कार्यरत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात तेलवाडी गावात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. सदर प्रकरण हे प्रसार माध्यमातून प्रसारित होत आहे. या प्रकरणी आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

तरी सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरुपाचे असल्याने प्रकरणी तातडीने कार्यवाही करुन त्याबाबतचा सविस्त अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२) व १२(३) नुसार आयोगास आज सायंकाळ पर्यंत सादर करावा, असे आदेशात नमूद केले आहे. या आदेशाची प्रत वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पैठण पोलीस स्टेशन, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना पाठवण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!