छत्रपती संभाजीनगर
Trending

कोयता, धारदार चाकू, छऱ्याच्या पिस्टलसह महिलेची दहशत ! सोशल मीडियावर व्हिडियो, जवाहरनगर पोलिसांनी केले जेरबंद !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ६- लोखंडी कोयता, धारदार चाकु, छऱ्याची पिस्टल, हॉकी स्टीक आदी धारदार शस्त्राच्या माध्यमातून दहशत पसरवणार्या महिलेस जवाहरनगर पोलिसांनी जेरबंद केले. काबरानगर भागात INSTAGRAM वर फोटो अपलोड करून दहशत पसरवल्याचा सदर महिलेवर आरोप आहे.

जवाहरनगर पोलिसांना दिनांक-05/07/2023 रोजी गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, काबरानगर गारखेडा परिसर भागातील महिला आयेशा परविन सरवर (रा. काबरानगर गारखेडा परिसर) हिच्या INSTAGRAM ACCOUNT वर धारदार लोखंडी कोयता, चाकू, छऱ्याची पिस्टल, हॉकी स्टिक हातात घेवून INSTAGRAM ACCOUNT वर नागरिकांमध्ये दहशत निर्माण होईल, असे व्हिडीओ बनवून अपलोड केलेले आहेत.

ही माहीती तातडीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक केंद्रे यांना देण्यात आली. सदर INSTAGRAM ACCOUNT वर असलेले व्हिडीओची खात्री करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी पोउपनी वसंत शेळके, सोबत पोह चंद्रकांत पोटे, पोअ मारोती गोरे, सदर महिलेचा शोध घेवून सदर महिलेवर कायदेशीर कारवाई करणेकामी योग्य त्या सूचना दिल्या.

त्यावरुन गोपनीय बातमीदारा मार्फत माहीती घेतली असता सदर महिला ही काबरानगर गारखेडा भागात राहणारी असून ती घरी असल्याचे सांगितले. त्यावरुन पोउपनी शेळके, मपोउपनि अनुराधा पाटील, मपोह उपाध्ये, पोअ मारोती गोरे, बाळासाहेब बैरागी, ज्ञानेश्वर शेलार, रावते, मपोअ निता मोतुळे सर्व स्टाफसह काबरानगर गारखेडा परिसर भागात धडकले. मिळालेल्या माहिती प्रमाणे सदर ठिकाणी जावून घरझडती घेतली असता घरामध्ये धारदार लोखंडी कोयता, चाकू, छऱ्याची पिस्टल, हॉकी स्टिक आदी शस्त्र मिळून आले.

आयेशा परवीन सरवर हिने धारदार शस्त्र हे मुलगा सोहेल सरवर याने आणल्याचे सांगितले. सदर महीला व मुलगा सोहेल सरवर याचे अभिलेख तपासले असता जवाहरनगर पोलिस स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सदर महिलेला शस्त्रासह पोलिस स्टेशनला हजर केले. सदर महीले विरुध्द पोस्टे जवाहरनगर पोलिसस्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहीया, पोलीस उप आयुक्त परिमंडळ- 02, शिलवंत नांदेडकर, सहाय्यक पो. आयुक्त रंजीत पाटील, उस्मानपुरा विभाग, वरिष्ट पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनी शेळके, मपोउपनि अनुराधा पाटील, पोह चंद्रकांत पोटे, मपोह उपाध्ये, पोअ मारोती गोरे, बाळासाहेब बैरागी, ज्ञानेश्वर शेलार, राम रावते, मपोअ निता मोतुळे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!