कन्नडछत्रपती संभाजीनगरवैजापूर
Trending

लोणी खुर्दच्या डिलक्स ॲटो गॅरेजवर छापेमारी, ९ गाड्या जप्त ! वैजापूर व कन्नड तालुक्यांतील साथीदारांच्या मदतीने चोरी !!

संभाजीनगर लाईव्ह, दि.१०- वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील डिलक्स ऑटो गॅरेजवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी करून मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश केला. वैजापूर व कन्नड तालुक्यातील साथीदारांच्या मदतीने या चोरांनी छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरातून चोरलेल्या मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या. सराईत मोटार सायकल चोर गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले. ५,१०,०००/- रूपये किंमतीच्या नऊ मोटार सायकली पोलिसांनी जप्त केल्या.

समद उर्फ समिर जमशेर पठाण (वय २३ वर्षे, रा. बाभुळतेल, ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर), काकासाहेब अण्णा बागुल (वय ३५ वर्षे रा. लोणी खुर्द, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), रामेश्वर पंडीत चव्हाण (वय २४ वर्षे, रा. गव्वाली तांडा, ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर ह.मु. कोलगेट गेट, एमआयडीसी वाळुज, छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

दिनांक १०/०८/२०२३ रोजी गुन्हे शाखेला माहीती मिळाली की, छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरातून चोरी केलेल्या मोटार सायकली या लोणी खुर्द (ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे एका जणाने त्याच्या मालकीच्या डिलक्स ॲटो गॅरेजमध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेल्या आहेत. त्यावरून गुन्हे शाखेचे पथकाने नियोजन करून डिलक्स ऑटो गॅरेज लोणी खुर्द (ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे जावून छापा मारला. सदर ठिकाणी मिळालेल्या माहितीप्रमाणे मोटार सायकली आढळून आल्या.

गॅरेजमध्ये हजर असलेला समद उर्फ समिर जमशेर पठाण (वय २३ वर्षे, रा. बाभुळतेल, ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर) यास सदर मोटार सायकली बाबत विचारपुस केली असता त्याने गॅरेजमध्ये बसलेले त्याचे साथीदार १) काकासाहेब अण्णा बागुल (वय ३५ वर्षे रा. लोणी खुर्द, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), २) रामेश्वर पंडीत चव्हाण (वय २४ वर्षे, रा. गव्वाली तांडा, ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर ह.मु. कोलगेट गेट, एमआयडीसी वाळुज, छत्रपती संभाजीनगर) यांचे सह छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरातून समीर याच्या मालकीच्या व रामेश्वर चव्हाण याच्या मालकीच्या मोटरसायकलवर येऊन इतर मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली.

सदर ठिकाणी मिळून आलेल्या मोटार सायकल बाबत पोलिस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर शहर येथील गुन्हे अभिलेख पडताळला असता पोलीस स्टेशन सिडको, एम वाळुज व सिटीचौक येथे मो.सा. चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीतांना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या मोटार सायकलीसह त्यांनी गुन्हा करतांना वापरलेल्या एकूण ५,१०,०००/- रूपये किंमतीच्या ९ मोटारसायकली जप्त केल्या. आरोपीतांना पुढील कायदेशिर कारवाई कामी पोलीस स्टेशन सिडको येथे हजर केले.

ही कामगिरी मा. पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अपर्णा गिते, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, धनंजय पाटील, प्रभारी पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के, पोउपनि / अजहर कुरेशी, पोह/संजय मुळे, पोह/संजय गावंडे, पोना/विठ्ठल सुरे, पोअं/सुनिल बेलकर, पोअं/नितीन देशमुख, पोअं/विशाल पाटील, पोअं/काकासाहेब आधाणे, पोअं/श्याम आढे, पोअं/ धर्मराज गायकवाड यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!