छत्रपती संभाजीनगर
Trending

रेशन दुकानात शिधापत्रिकेवरील प्रती व्यक्तीनुसार 5 किलो धान्य मोफत ! धान्य वितरणाबाबत सर्व तहसिल व रास्त भाव दुकानदारांना निर्देश !!

‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा’ अंतर्गत मोफत धान्य वाटपाचा लाभ घेण्याचे आवाहन

Story Highlights
  • जिल्ह्यातील 66 हजार 119 अंत्योदय शिधापत्रिका व 19 लक्ष 45 हजार 446 प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थी मोफत धान्याचा लाभ घेण्यास पात्र
  • अंत्योदय अन्न योजना (पिवळे कार्ड) मधील लाभार्थ्यांना प्रत्येक शिधापत्रिका निहाय 15 किलो गहू व 20 किलो तांदूळ असे 35 किलो धान्य मोफत

संभाजीनगर लाईव्ह, दि. 08  : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत पात्र लाभर्थ्यांना मोफत धान्य देण्यात येत आहे. मोफत धान्य जानेवारी ते डिसेंबर 2023 पर्यंत देण्यात येणार आहे. या अंतर्गत प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना शिधापत्रिकेवरील व्यक्तीच्या संख्येनुसार प्रती व्यक्ती 2 किलो गहू व 03 किलो तांदूळ असे एकूण 5 किलो धान्य मोफत देण्यात येत आहे.

तसेच अंत्योदय अन्न योजना (पिवळे कार्ड) मधील लाभार्थ्यांना प्रत्येक शिधापत्रिका निहाय 15 किलो गहू व 20 किलो तांदूळ असे 35 किलो धान्य मोफत देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त अंत्योदय अन्न योजनेच्या प्रत्येक शिधापत्रिकेस 1 किलो साखर रु.20/- प्रति किलो प्रमाणे देण्यता येत आहे.

जिल्ह्यातील 66 हजार 119 अंत्योदय शिधापत्रिका व 19 लक्ष 45 हजार 446 प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थी मोफत धान्याचा लाभ घेण्यास पात्र आहेत. जिल्ह्यातील 1 हजार 802 रास्त भाव दुकानांमार्फत माहे जानेवारी 2023 पासून मोफत धान्य वितरणाबाबत सर्व तहसिल व रास्त भाव दुकानदारांना सूचना देण्यात आल्या आहेत असे जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी कळविले आहे.

Back to top button
error: Content is protected !!