छत्रपती संभाजीनगर
Trending

बेगमपुरा पोलिस स्टेशनच्या आवारातच रात्री १२ वाजता दोन गटांत तुंबळ हाणामारी ! माझा मुलगा घाटी दवाखान्यात अ‍ॅडमीट आहे, त्याला मारणारे लोक कुठे ? पहा पुढे काय झाले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – आमखास मैदानात झालेल्या भांडणामध्ये मार लागलेले तिघे बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये मेडिकल मेमो घेण्यासाठी गेले असता तेथे दुसरा गट दाखल झाला. माझा मुलगा घाटी दवाखान्यात अ‍ॅडमीट आहे, त्याला मारणारे लोक कुठे ? असा सवाल उपस्थित करून या गटाने दुसर्या गटावर हल्ला चढवला. उपस्थित पोलिसांनी ही माहिती तातडीने वरिष्ठांना दिली. वरिष्ठ फौजफाट्यासह आले आणि त्यांनी हे भांडण सोडवले. बेगमपुरा पोलिस स्टेशनच्या आवारात रात्री १२ वाजेच्या सुमारास हा राडा झाला.

प्रथम माहिती अहवालानुसार, दि. 03/07/2023 रोजी अंदाजे 23.45 वाजेच्या सुमारास 1 ) मो. खलीद मो. अझहर वय 32वर्षे धंदा. किराणा दुकान रा. आसेफीया कॉलनी छत्रपती संभाजीनगर, 2) फैसलखान फेरोजखान वय 19 वर्षे रा. बिसमील्ला कॉलनी छत्रपती संभाजीनगर, 3) फैजखान आरेफखान वय 17 वर्षे रा. आसेफीया कॉलनी छत्रपती संभाजीनगर हे बेगमपुरा पोलिस स्टेशनला आले.

आम्हाला आमखास मैदान येथे भांडणामध्ये मार लागल्याचे व आम्हाला औषध उपचार कामी दवाखान्यात जायचे आहे असे सांगितल्याने बेगमपुरा पोलिस स्टेशनमधील पोलिसांनी त्यांना मेडीकल मेमो देवून उपचारासाठी रवाना केले असता व सदर जखमी घाटी दवाखाना येथे औषध उपचार करणे कामी जाण्यासाठी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये थांबलेले असताना दि. 04/07/2023 रोजी 00.05 वाजेच्या सुमारास हनीफ कुरेशी रा.सिल्लेखाना छत्रपती संभाजीनगर हा 8 ते 10 अनोळखी लोकांना सोबत घेवून आला.

माझा मुलगा घाटी दवाखान्यात अॅडमीट आहे. त्याला मारणारे लोक कुठे आहे ? असे म्हणुन त्याने व त्याच्या सोबत असलेल्या 8 ते 10 अनोळखी लोकांनी मेडीकल मेमो दिलेल्या 1 ) मो. खलीद मो.अझहर वय 32वर्षे धंदा. किराणा दुकान रा. आसेफीया कॉलनी छत्रपती संभाजीनगर, 2) फैसलखान फेरोजखान वय 19 वर्षे रा. बिसमील्ला कॉलनी छत्रपती संभाजीनगर, 3) फैजखान आरेफखान वय 17 वर्षे रा. आसेफीया कॉलनी छत्रपती संभाजीनगर यांच्या सोबत आपसात मारामारी करून झुंज केली. उपस्थित पोलिसांनी तातडीने पिटर मोबाईलवर असलेले डिओ अधिकारी सफौ. मोरे यांना ही माहिती दिली. त्यामुळे ते स्टॉपसह पोलिस स्टेशनला आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचे भांडण सोडवले.

यासंदर्भात बेगमपुरा पोलिस स्टेशनचे पोह गोरखनाथ सर्जेराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 1 ) मो. खलीद मो. अझहर वय 32वर्षे धंदा. किराणा दुकान रा. आसेफीया कॉलनी छत्रपती संभाजीनगर, 2) फैसलखान फेरोजखान वय 19 वर्षे रा. बिसमील्ला कॉलनी छत्रपती संभाजीनगर, 3) फैजखान आरेफखान वय 17 वर्षे रा. आसेफीया कॉलनी छत्रपती संभाजीनगर, 4) हनीफ कुरेशी रा.सिल्लेखाना छत्रपती संभाजीनगर व 8 ते 10 अनोळखी लोकांवर बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!