छत्रपती संभाजीनगरझेडपी
Trending

जिल्हा परिषद शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लागणार ! पदोन्नती, निवड श्रेणीवर बैठकीत मिळाले हे आश्वासन !!

Story Highlights
  • ११ जून पूर्वी मुख्याध्यापक पदोन्नती व निवड श्रेणी मार्गी लावणार असल्याचे शिक्षण अधिकारी यांचे आश्वासन
  • जुलै महिन्यात केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षक पदोन्नती करणार बैठकीत ठरले
  • प्रश्नांची सोडवणूक करण्यास झालेल्या दिरंगाई ची चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई करावी तसेच गोपनीय अवहाल जतन न कणारे लिपिकावर कारवाई करण्याची संघटनांनी केली बैठकीत मागणी
  • सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा

संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ – जिल्हा परिषद शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी पाठपुरावा सुरु असलेल्या बैठकीत आज समाधानकारक आश्वासन मिळाले. सर्व विषयावर सकारात्मक चर्चा झाली. विभागीय आयुक्त आज आणि उद्या कामानिमित्त नसल्याने उपायुक्त यांच्या दालनात ही शिक्षक संघटनांची बैठक पार पडली. प्रलंबित मागण्या दिलेल्या आश्वासनानुसार पूर्ण न झाल्यास १२ जून रोजी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशाराही संघटनांनी याच बैठकीत दिला.

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या विविध संवर्ग च्या पदोन्नती प्रक्रियेला होत असलेला विलंब व निवडश्रेणी, चटोपाध्याय, कर्मचारी कल्याण निधी हिशोब न देणे असे सार्वजनिक व वैयक्तिक प्रश्नांची सोडवणूक होण्यास जिल्हा परिषदकडून मागील १३ महिन्यांपासून दप्तर दिरंगाई सुरू आहे. केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक व पदवीधर शिक्षक पदोन्नतीला जिल्हा परिषदेकडून होत असलेला विलंब म्हणून आदर्श शिक्षक समिती व शिक्षक परिषद दोन्ही संघटनांनी मागील एक वर्षांपासून विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदन देऊन न्याय मिळवून द्यावा म्हणून मागणी करत आहे.

याची वेळोवेळी दखल घेऊन विभागीय आयुक्त यांनी जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी व संबंधित विभागाचे लिपिक यांना ५ जून रोजी दुपारी १ वाजता आयुक्त कार्यालयात सर्व अवहाल घेऊन बोलावले. संघटना सोबत सोक्षमोक्ष सुमारे दीड तास झालेल्या चर्चेत पदोन्नती, माध्यमिक शिक्षक बदल्या, निवडश्रेणी, कर्मचारी कल्याण निधी, सह विविध प्रकारच्या मुद्यावर संघटनांनी प्रश्न उपस्थित केले.

यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद प्रशासन शिक्षकांना ,संघटनांना व दस्तुरखुद्द विभागीय आयुक्त कार्यालय यांना प्रश्न महिन्यात सोडवण्याचे आश्वासन देते अन प्रश्न वर्ष वर्ष प्रलंबित ठेवते. आयुक्तांनी सात आठ वेळा लेखी निर्देश देवूनही जिल्हा परिषद प्रश्न सोडवत नाही. हा प्रश्न उपस्थित केला असता उप आयुक्तांनी जिल्हा परिषदेचे लिपिक पासून सर्वच कारवाईस पात्र असल्याचे यावर बोलले. यावर संघटनेचे प्रतिनिधी यांनी लेखी निवेदन देऊन दप्तर दिरंगाईची चौकशी व्हावी ही मागणी लावून धरली.

चर्चेत दरम्यान आयुक्तांनी शिक्षण अधिकारी यांना मुख्य म्हणजे सर्व पदोन्नती प्रक्रिया बाबत व निवड श्रेणी बाबत कधी निर्णय घेणार तात्काळ सांगा असे विचारले असता शिक्षण अधिकारी यांनी मुख्याध्यापक पदोन्नती, माध्यमिक शिक्षक पदोन्नती व निवड श्रेणी ११ जून पूर्वी तीन विषय मार्गी लावते म्हणून सांगितले व उर्वरित जुलै महिन्यात केंद्रप्रमुख, पदवीधर शिक्षक पदोन्नती प्रश्न मार्गी लावणार असल्याचे बैठकीत सांगितले.

याचबरोबर विविध वैयक्तिक शिक्षकांचे प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल. फाईल निकाली काढण्यासाठी विलंब होणार नाही याची दक्षता यापुढे घेतली जाईल असे शिक्षण अधिकारी यांनी बैठकीत सांगितले. सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. विभागीय आयुक्त आज आणि उद्या कामानिमित्त नसल्याने उपायुक्त यांच्या दालनात ही बैठक झाली.

या बैठकीला उपायुक्त बेधमुथा, शिक्षण अधिकारी व संबंधित विभागाचे कर्मचारी याचबरोबर आदर्श शिक्षक समिती व शिक्षक परिषदचे राज्यनेते बाबुराव गाडेकर, आदर्श शिक्षक समितीचे संस्थापक दिलीप ढाकणे, राज्य सचिव अंजुम पठाण, परिषदचे जिल्हा अध्यक्ष श्रीराम बोचरे, दिलीप गोरे, समितीचे राजेश आचारी, किशोर पवार, मनोहर पठे, ज्ञानेश्वर पठाडे, गणेश सोनावने, संजय खोमणे, कृष्णा बोरुडे,सुखदेव दाभाडे, आदींची उपस्थिती होती.

Back to top button
error: Content is protected !!