संभाजीनगर जिल्ह्यात उद्यापासून जमावबंदी व शस्रबंदी, 354 जणांना नोटिसा ! 197 ग्रामपंचायतीसाठी 639 मतदान केंद्रावर राहणार पोलिसांचा तगडा बंदोबस्त !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – जिल्ह्यात होऊ घातलेल्या 197 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी पोलिस प्रशासनाने आपली कंबर कसली आहे. भयमुक्त व खुल्या वातावरणात निवडणुका पार पडाव्या यासाठी 639 मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. जिल्हयाधिकारी यांनी सी.आर.पी.सी कलम 144 (1) (3) नुसार जमावबंदी आदेश निर्गमित केले असून हे आदेश दिनांक 18/12/2022 ते दिनांक 20/12/2022 या कालावधीत सकाळी 06.00 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत लागु आहे. दरम्यान, जिल्हा पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी ग्रामीण भागात भेटी देऊन आढावा घेतला.
सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक – 2022 च्या अनुंषगाने औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात निवडणूक भयमुक्त व खुल्या वातावरणात होण्याच्या दृष्टीने मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी दिनांक 16/12/2022 रोजी बिडकीन येथील सरस्वती भुवन हायस्कूल, जि.प. प्राथमिक शाळा व जि.प. प्राथमिक शाळा, कृष्णापूर येथे भेटी देवून शाळेच्या परिसराची व मतदान खोल्यांची पाहणी केली. लाडसांवगी (करमाड) येथील जि.प. प्रशाला शाळेतील मतदान बुथ पाहणी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जि.प.शाळे पर्यंत पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात पथसंचलन करण्यात आले. यानंतर स्थानिक ग्रामस्थांची बैठक घेवून त्यांना निवडणुकीच्या संदर्भाने मार्गदर्शन व सुचना करून सुरक्षा दृष्टीकोनातून आढावा घेतला.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान कोणत्याही व्यक्तीने कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने परिस्थिती निर्माण केल्यास तसेच आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होईन असे वर्तन केल्यास त्याची गय केली जाणार नाही अशा सक्त सूचना/चेतावणी दिली.
सोशल मीडियावर सुध्दा सायबर पोलिसींची कटाक्षाने नजर असून कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट/संदेश निर्मित करणे, प्रसारित किंवा पुढे पाठवणे टाळावे अशा प्रकारचे कृत्य करणा-या व्यक्तीवरं तात्काळ प्रचलित कायदान्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने तरूण युवकांनी यामध्ये सक्रिय होताना कोणत्याही भुलथापाना व प्रलोभनास बळी पडु नये. स्थानिक पातळीवर कोणत्याही अनुचित प्रकारामध्ये किंवा आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होईन असे वर्तन करू नये. ज्यामुळे त्यांचे वर गुन्हे दाखल होवून, पोलीस रेकॉर्ड बनेल कारण दाखल गुन्हयाची माहिती ही चारित्र्य प्रमाणपत्रावर नोंद होत असल्याने भविष्यातील उज्जवल व चांगल्या संधीस युवकांना मुकावे लागेल. यामुळे निवडणुक काळात युवकांनी जबाबदारीने वागने अत्यंत आवश्यक आहे असे आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केले. यावेळी सुनील लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, मा. डॉ. विशाल नेहुल, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांचे उपस्थिती होती.
जिल्हयातील 197 ग्रामपंचायती करिता 639 मतदान केंद्राद्वारे निवडणुक प्रक्रिया राबविली जाणार असून पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात जिल्हयात सर्व ठिकाणी शांततेमध्ये निवडणुक होण्यासाठी मतदानकेंद्र निहाय मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांचे नियंत्रणाखाली पुढील प्रमाणे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यासाठी 06 पोलीस उप अधीक्षक, 10 पोलीस निरीक्षक, 23 स.पो.नि. 43 पो.उप.नि. पोलीस अंमलदार 1011, होमगार्ड 600, एस.आर.पी. एफ. दंगाकाबु पथक यांच्या तुकड्या मोठया प्रमाणावर कर्तव्यार्थ राहतील. यासह मतदान केंद्र निहाय पोलीस पेट्रालिंग व पोलीस सेक्टर पेट्रालिंगची आखणी करण्यात आली आहे. तसेच जिल्हयातील 23 पोलीस ठाणे अंतर्गत 35 गावांत पोलीसांचे पथसंचलन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ज्यामध्ये सीआरपीसी कलम 107 नुसार 363 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असुन, सीआरपीसी _कलम 149 नुसार 354 व्यक्तींना नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम चे कलम 93 नुसार 20 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.
याचप्रमाणे जिल्हयात जिल्हयाधिकारी यांनी सी.आर.पी.सी कलम 144 (1) (3) नुसार जमावबंदी आदेश निर्गमित केले असून सदर आदेश हे दिनांक 18/12/2022 ते दिनांक 20/12/2022 या कालावधीत सकाळी 06.00 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत लागु आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1), 37 (3) अन्वये शस्त्रबंदी आदेश लागू केले आहे. ज्याद्वारे सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर किंवा जवळपास शस्त्रे, सोटा, तलवार,भाले, दंडे, बंदुका, रिव्हॉलव्हर, सुरे, काटया/लाठया, किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा कोणत्याही वस्तु जवळ बाळगता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीच्या अगर समुहाच्या भावना जाणुन बुजून देखाव्याच्या उद्देशाने वाद्ये वाजविणार नाही किंवा प्रक्षोभक किंवा जाहिर असभ्य वर्तन करणार नाही. प्रतिमा अथवा प्रते किंवा आकृत्या यांचे प्रदर्शन करणार नाही. नमुद आदेश हे दिनांक 23/12/2022 रोजीचे 24.00 वाजे पर्यंत लागु राहतील.
ग्रा.पं. निवडणुकीच्या दृष्टीने गावात शांतता राखणे, आदर्श आचार संहितेचे पालन करणे, कोणाताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीसांना माहिती द्यावी. याकरिता शांतता समितीच्या ग्रामस्तरावर 138 बैठका घेण्यात येवून त्याद्वारे आदर्श आचार संहितेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe