जिल्हा परिषदेचा मुख्याध्यापक लाच घेताना रंगेहात पकडला ! वेतन श्रेणीच्या लाभासाठी घेतले 10 टक्के !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २९ – जिल्हा परिषदेचा मुख्याध्यापक लाच घेताना रंगेहात पकडला. वेतन श्रेणीच्या लाभासाठी 10 टक्के प्रमाणे 2700 रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. चहापाणी अमृततुल्य हॉटेल, जुन्या बस स्थानक जवळ, भगवती टॉकीज रोड, गेवराई ता.गेवराई जी.बीड येथे ही कारवाई करण्यात आली.
भारत शेषेराव येडे, वय -57 वर्ष, व्यवसाय नौकरी, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मण्यारवाडी ता. गेवराई जी.बीड रा. सुयोग शिक्षक कॉलनी, कोल्हेर रोड, गेवराई मूळ रा.अंजननवती ता.जी बीड (वर्ग -3) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आहेर वाहेगाव ता.गेवराई येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांना चटोपाध्याय /वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ अटी व शर्ती नुसार मान्य केले असून संबंधित मुख्याध्यापक व गटशिक्षण अधिकारी यांनी वरिष्ठ श्रेणी देय आहे किंवा कसे असे पत्र काढले होते.
त्यावरून तक्रारदार यांचे वरील वरिष्ठ श्रेणी चे बिल तयार करून ते बील गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गेवराई व जिल्हा परिषद बीड येथून मंजूर करून देण्यासाठी एकूण बिलाची रक्कम 27000/रू. चे 10 टक्के प्रमाणे 2700/रू. लाचेची पंचासमक्ष लाचेची मागणी करून लाच रक्कम 2700 /- रू स्वतः स्वीकारले असता लोकसेवक भारत येडे यांना लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले आसून त्यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोस्टे गेवराई येथे चालू आहे.
ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर, मुकुंद अघाव, अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी युनूस शेख, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.बीड, सह सापळा अधिकारी:- गुलाब बाचेवड पो. नि. ला. प्र वि बीड, पर्यवेक्षण अधिकारी – शंकर शिंदे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. बीड, सापळा पथक – पोलीस अंमलदार, सुरेश सांगळे, भरत गारदे, अविनाश गवळी, अंबादास पुरी, निकाळजे, गणेश मेहेत्रे ला. प्र. वि. बीड यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe