कोल्हापूर जिल्ह्यात 19 जून पर्यंत बंदी आदेश लागू ! पोलिस प्रशासन अॅक्शन मोडवर !!
कोल्हापूर, दि. 7 : कोल्हापूर जिल्ह्यात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्याच्या कारणावरुन हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे परिस्थिती चिघळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून दोन धर्माच्या मध्ये तेढ निर्माण झालेली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एखादे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून तसेच आक्षेपार्ह स्टेटस ठेवनू तेढ निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी दिनांक 19 जून रोजी रात्री 8 वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये बंदी आदेश जारी केला आहे.
कलम 37 (1) -शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदूका, सुऱ्या, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. दगड किंवा इतर शस्त्रात्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन. जाहिरपणे घोषणा करण्यास बंदी घातली आहे.
गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे. ज्यामुळे सभ्यता अथवा नितिमत्ता यास धक्का पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा जनतेत प्रसार करणे.
कलम 37 (3)- जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमणेस, मिरवणुका काढणे व सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा हुकुम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तत्ये व अधिकार बजाविणे संदर्भात उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधिक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पेालीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा शांततामय मार्गाने साजरे करण्याकरिता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादींना लागू पडणार नाही. हा आदेश दिनांक 19 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अंमलात राहील.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe