देश\विदेशमहाराष्ट्र
Trending

केंद्र शासनाकडून सुधारित नियतन प्राप्त, ऑक्टोबर महिन्याकरीता गहू व तांदूळ वितरीत होणार !

पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित रहायला नको

मुंबई, दि. 20 : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री यांच्या प्रयत्नाने माहे ऑक्टोबर या महिन्याकरीता गव्हाच्या नियतनामध्ये केंद्र शासनाकडून सुधारित नियतन प्राप्त झाले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर महिन्याकरीता विहीत परिमाणात गहू व तांदूळ वितरीत होणार आहे. तसेच, पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत.

केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 6 व 7 (PMGKAY 6 & 7) योजनेअंतर्गत अन्नधान्याच्या वितरणानंतर शिल्लक 30069.65 टन तांदूळ व 45972.59 टन गव्हाचे समायोजन राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत माहे ऑगस्ट, 2023 च्या अन्नधान्यात करीत असल्याचे कळवले होते. अन्नधान्य वितरणाच्या आकडेवारीची काही माहिती केंद्र शासनाच्या संचालक, सार्वजनिक वितरण यांनी अद्याप अद्ययावत केला नसल्याने, केंद्र शासन व राज्य शासनाच्या अन्नधान्य वितरणाच्या आकडेवारीमध्ये तफावत आहे.

त्या अनुषंगाने ही माहिती अद्ययावत केल्यानंतर त्यानुसार शिल्लक अन्नधान्याचे समायोजन माहे ऑक्टोबर,2023 च्या नियतनात करण्यात यावे, याबाबत विभागामार्फत केंद्र शासनास विनंती करण्यात आली होती. तथापि, केंद्र शासनाने त्यांच्याकडील उपलब्ध वितरणाच्या आकडेवाडीनुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 6 व 7 (PMGKAY 6 & 7) योजनेअंतर्गत अन्नधान्याच्या वितरणानंतर शिल्लक अन्नधान्याचे समायोजन माहे ऑक्टोबर,2023 मध्ये करण्याकरीता सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत माहे ऑक्टोबर, 2023 च्या नियतनात पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे. सद्यस्थितीतील नियतन यामध्ये तांदूळ (टन) 2,45,610.240, गहू (टन) 1,38,155.760 एकूण (टन) 3,83,766 याप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे, तर केंद्र शासनाच्या पत्रानुसार PMGKAY 6 व 7 अंतर्गत शिल्लक अन्नधान्य यामध्ये तांदूळ में.टन 30069.65, गहू टन 45972.59 तर एकूण टन 76042.24 आहे. उपरोक्त शिल्लक विचारात घेऊन माहे ऑक्टोबर, 2023 करिता सुधारित नियतन टन मध्ये तांदूळ 215540.59, गहू 92183.17 एकूण 307723.76 याप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे. एकूण 76000 टन अन्नधान्यापैकी 30772 टन तांदूळ जिल्ह्यांकडे उपलब्ध असून माहे ऑक्टोबर मधील नियतनात समायोजित करण्यात आलेला आहे.

45,972.59 टन एवढ्या मोठ्या परिमाणात गव्हाचे समायोजन एका महिन्यात केल्यास लाभार्थ्यांना गहू वितरीत करणे कठीण होऊन पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपरोक्त 45972.59 टन गव्हाचे समायोजन माहे ऑक्टोबर या एका महिन्याऐवजी माहे ऑक्टोबर ते डिसेंबर, 2023 या 3 महिन्यांच्या कालावधीत करण्याबाबत केंद्र शासनास लेखी विनंती करण्यात आली होती. या विनंतीस अनुसरुन केंद्र शासनाने पुढीलप्रमाणे सुधारित नियतन कळविले आहे. सद्यस्थितीतील नियतन 1,38,155.760 गहू (टन), केंद्र शासनाच्या पत्रानुसार PMGKAY 6 व 7 अंतर्गत शिल्लक अन्नधान्य 45972.59 आहे, तर ऑक्टोबर, 2023 करिता सुधारित नियत 1,22,831.56 आहे. नोव्हेंबर, 2023 करिता सुधारित नियतन 1,22,831.56 तर डिसेंबर, 2023 करिता सुधारित नियतन 1,22,831.56 याप्रमाणे केंद्र शासनाने सुधारीत नियतन कळविले आहे.

Back to top button
error: Content is protected !!