छत्रपती संभाजीनगर
Trending

समृद्धी महामार्गावर देशी दारुचा ट्रक व कपड्याच्या ट्रकमध्ये अपघात ! जालन्याकडे जात असताना करमाड हद्दीत धडक, देशी दारूच्या ट्रकने पेट घेतला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. 20 – देशी दारूच्या बॉटलने भरलेला ट्रक व कपड्याने भरलेला बंद बॉडीच्या ट्रकचा अपघात झाल्याची घटना समृद्धी महामार्गावर रात्री 02:30 वाजेच्या सुमारास घडली. छत्रपती संभाजीनगर-जालना दरम्यान पोलिस ठाणे करमाड हद्दीत ही घटना घडली.

यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस ठाणे करमाड हद्दीत जयपूर ते करजगाव दरम्यान समृद्धी महामार्गावर ही घटना घडली. छत्रपती संभाजीनगर ते जालना या मार्गावर जात असताना देशी दारूच्या बॉटलने भरलेला ट्रक व कपड्याने भरलेला बंद बॉडीचा ट्रक यांच्यात ही धडक झाली.

दोन्ही ट्रक या जालन्याकडे जात असताना समृद्धी महामार्गावर रात्री 02:30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर देशी दारूच्या ट्रकने पेट घेतला. दारूने पेट घेतल्याने बॉटल फुटून आगिचा पुन्हा पुन्हा भडका उडत होता. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी तातडीने धाव घेतली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फायर ब्रिगेडलाही कॉल करण्यात आला. कॉल मिळताच फायर ब्रिगेडही घटनास्थळी दाखल झाले. याचदरम्यान पोलिसांनी जाम झालेली ट्राफिक सुरळीत केली. आगिचा भडका उडत असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेऊन पुढील अनर्थ टाळण्याची पूर्ण खबरदादी घेतली. महामार्ग सुरक्षाचे पोलीस सुद्धा घटनास्थळी हजर झाले. त्यांनीही मदतकार्य जोमाने केले.

Back to top button
error: Content is protected !!