छत्रपती संभाजीनगर
Trending

देवाई महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष, कार्यकारी संचालक, शाखा व्यवस्थापकासह सात कर्जदारांवर गुन्हा ! अमर्याद कर्ज वाटप करून संस्थेच्या पैशांचा अपहार !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३०- देवाई महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष, कार्यकारी संचालक, शाखा व्यवस्थापकासह सात कर्जदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमर्याद कर्ज वाटप करून संस्थेच्या पैशाचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत देवाई महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत बीडबायपास रोड छत्रपती संभाजीनगर या पतसस्थेतील हा प्रकार समोर आला आहे.

1) अध्यक्ष सौ महादेव काकडे 2) कार्यकारी संचालक महादेव अच्युतराव काकडे 3) शाखा व्यवस्थापक 4) सर्व संबंधित प्रमुख 5) सर्व कर्मचारी 6) एकूण सात कर्जदार अशी आरोपींची नावे आहेत.

दत्तात्रय प्रभाकर धुमाळ (वय 56 वर्षे, व्यवसाय- प्रमाणित लेखापरीक्षक सहकारी संस्था श्रेणी ब (1), नामतालीका पॅनल क्रमांक 15167, सहकार विभाग, महाराष्ट्र राज्य, विभागीय कार्यालया, छत्रपती संभाजीनगर. पत्ता- इवाळकर रुम देवगिरी हॉस्पिटलसमोर, लाडगाव रोड, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत नमूद केले आहे की, यातील आरोपीतांनी संगणमत करून महाराष्ट्र सहकार अधिनियम व संस्थेचे पोट नियमाचे उलब्धन करून आरोपी फर्म व व्यक्तीना अमर्याद कर्ज वाटप करून संस्थेच्या पैशाचा अपहार केला. आयसीआयसीआय बँकेत संस्थेचे पैसे गुंतवणुक (FD) केली असे तळेबंदास दाखविले परंतु गुतवणुक केली नाही व संस्थेच्या पैश्याचा अपहार केला व संस्थेचे आर्थिक नुकसान करून संस्थेची व सभासदांची ( ठेवीदार ) फसवणुक केली आहे. या आशयाच्या फिर्यादीवरुन पोनि यांच्या आदेशाने DOअधिकारी पोउपनि एस. जे. चव्हाण यांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोनि आर्थिक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे दिला आहे.

याप्रकरणी सातारा पोलिस स्टेशनमध्ये 307/23 406,409, 420, 465, 467, 468, 471,120(B), 217, 34 IPC सहकलम महाराष्ट्र ठेवेदारच्या वित्तय संस्था मधिल हितसंबधाचे (संरक्षण) अधिनियम 1998 कलम 3. महाराष्ट्र सहकारी अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!