छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र
Trending

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला द्वितीय पुरस्कार ! खंडोबाचीवाडी, कुंडल आणि टिकेकरवाडी ग्रामपंचायत प्रथम !!

महाराष्ट्राचा 5 राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान

Story Highlights
  • प्रथम क्रमांकाचे तीन तर व्दितीय व तृतीय क्रमांकाचा प्रत्येकी एक पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 17 : ग्रामपंचायतींमध्ये सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील 5 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी, कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला व्दितीय क्रमांकाच्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अलाबाद या ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाच्या पुरस्काने केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Back to top button
error: Content is protected !!