छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

सिद्धार्थ जलतरण तलाव शनिवारपासून सुरू होणार ! बंद दरम्यानचा उर्वरित कालावधी वाढवून देणार !!

संभाजीनगर लाईव्ह, १९ – येत्या शनिवारपासून सिद्धार्थ जलतरण तलाव सुरु होणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने दिनांक १७ जुलै पासून फिल्टर दुरुस्ती करिता सिद्धार्थ जलतरण तलाव बंद ठेवण्यात आला होता.

मुख्य उद्यान अधिकारी यांच्या प्राप्त माहिती नुसार आता सिद्धार्थ जलतरण तलावाचे फिल्टर दुरुस्ती चे काम पूर्ण झाले असून दिनांक २१ /१०/२०२३ शनिवार पासून सर्व सभासदांसाठी  सिद्धार्थ जलतरण तलाव पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे.

तसेच मासिक, त्रीमासिक व वार्षिक सभासदांचा बंद दरम्यानचे उर्वरित कालावधी जलतरण तलाव पूर्ववत सुरू झाल्याच्या दिनांक पासून वाढवून देण्यात येणार आहे.

Back to top button
error: Content is protected !!