छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका

हडको परिसरातील चार अतिक्रमणावर मनपाचा हतोडा ! म्हशीच्या गोठ्यावर जेसीबी फिरवला !

खुल्या जागेवरील चार अतिक्रमण जमीनदोस्त

संभाजीनगर लाईव्ह, दि. १४- महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथकामार्फत खुल्या जागेवरील (ओपन स्पेस) अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. हडको परिसरातील छत्रपती नगर, भारतमाता नगर या भागातील खुल्या जागेवरील एक म्हशीचा गोठा अंदाजे तीस मीटर बाय वीस मीटर या आकाराच्या जागेत संबंधिताने पत्र्याचे शेड मारून रूम काढली होती व इतर खुल्या जागेमध्ये म्हशी बांधत होते.

सदर बांधकाम निष्कशीत करण्यात आले. याच्या बाजूला प्रदीप देविदास शार्दुल या व्यक्तीने आपल्या घरालगत 15 बाय 15 ची लोखंडी जाळीमारून अतिक्रमण केले होते व जागेचा खाजगी वापर करत होता तेही निष्काशीत करण्यात आले. याच खुल्या जागेत विलास लहाने यांनी पंधरा बाय दहा ची पत्र्याची रूम केली होती व या रूममध्ये पाण्याच्या जार चा वापर व्यवसाय करत होते. तसेच एका व्यक्तीने रस्त्यांमध्ये तीन बाय पाच या आकाराची पाण्याची टाकी बांधली होती हे चारही अतिक्रमण आज जमीनदोस्त करण्यात आले.

सध्या सदर खुल्या जागेवरील अतिक्रमण काढणे बाबत सिडको अभियंता आणि मनपाच्या वतीने पंधरा दिवसांपूर्वी तोंडी सूचना दिल्या होत्या परंतु त्यांनी या सूचनां कडे दुर्लक्ष करून सदर अतिक्रमणे काढले नाही म्हणून आज सदर अतिक्रमणे जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले व खुली जागा लहान मुलांच्या खेळण्यासाठी वापरण्यासाठी जेसीबीच्या साह्याने सपाट करण्यात आली.

खुल्या जागेवरील अतिक्रमणे काढल्यामुळे सिडको हडको भागातील नागरिकांनी व स्थानिक लहान खेळाडूंनी मनपाचे अभिनंदनही केले. सदर कारवाई हडको छत्रपती नगर ई सेक्टर कारवाई करण्यात आली. सदर कारवाई प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभाग प्रमुख सविता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, रामेश्वर सुरासे , सिडकोचे मिलन खिल्लारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button
error: Content is protected !!