छत्रपती संभाजीनगरवैजापूर
Trending

वैजापूर तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायत जागेवर मध्यरात्री दीड वाजता पुतळा बसवल्याने गुन्हा दाखल !! सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत १० ते १२ लोक आढळले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १६- वैजापूर तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायत जागेवर कुठलीही परवानगी न घेता रात्री १ ते १.३० वाजेदरम्यान पुतळा बसवल्याने ग्रामविकास अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात येत असून फुटेजमध्ये १० ते १२ लोक दिसत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

रमेश राजाराम शिनगारे (ग्रामविकास अधिकारी, खंडाळा, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दिनांक 15/10/2023 रोजी सकाळी 09.00 वा ग्रामपंचायत कार्यालय खंडाळा येथील लिपीक योगेश पांडुरंग पवार यांनी फोन करून माहिती दिली की खंडाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारी ग्रामपंचायतच्या जागेवर कोणीतरी अज्ञात लोकांनी श्री विर एकलव्य यांचा पूर्णाकृती पुतळा बसवला आहे.

ही माहीती दिल्याने ग्रामविकास अधिकारी रमेश शिनगारे तातडीने मौजे खंडाळा येथे पोहोचले. तेथे ग्रामपंचायतचे कर्मचारी व सदस्य तसेच उपसरपंच यांनी सदर ठिकाणी पाहणी केली असता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारी ग्रामपंचायतच्या जागेवर कोणीतरी अज्ञात लोकांनी श्री विर एकलव्य यांचा अंदाजे तीन फुट उंचीचा पूर्णाकृती पुतळा तीन फुट उंचीच्या एका लोखंडी स्टँडवर बसवलेला दिसला. त्यानंतर तेथे पोलिस आले. सर्वांनी गावातील संदेश फोटो स्टुडिओ यांच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता सदर फुटेजमध्ये 10 ते 12 लोक दिसत आहेत.

याप्रकरणी रमेश राजाराम शिनगारे (ग्रामविकास अधिकारी, खंडाळा, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखीवर वैजापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसकरत आहे.

Back to top button
error: Content is protected !!